सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

Apr 03, 2019, 13:34 PM IST
1/5

सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

टेलिव्हिजन कार्यक्रमांतून नावारुपास येत चित्रपट विश्वातही आपलं नशीब आजमावू पाहणारा एक चेहरा म्हणजे विनोदवीर कपिल शर्मा याचा. आपल्या अनोख्या अंदाजात बी - टाऊनच्या मोठमोठ्या कलाकारांना आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिलच्या करिअरला चांगली चालना मिळाली. 

2/5

सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

पण, काळापूर्वी कार्यक्रमातील सहकलाकारांसोबत झालेल्या वादामुळे कपिलच्या करिअरमध्ये असं एक वळण आलं जे सर्व परिस्थितीला कलाटणी देऊन गेलं. सुनील ग्रोव्हरसोबत असणाऱ्या मतभेदांचा मुद्दा कलाविश्वाच्या वर्तुळात बराच चर्चेत राहिला. पण, त्या दोघांमध्ये नेमका काय वाद झाला होता, याची संपूर्ण माहिती कपिलकडूनही मिळाली नाही, किंवा सुनीलकडूनही. 

3/5

सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

बऱ्याच अंशी या मुद्द्यावर मौन बाळगल्यानंतर आणि या संबंधांना सुधारण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलण्याच्या दृष्टीने निर्णय घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनीही वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याच वातावरणात आता खुद्द कपिल शर्मा यानेच अभिनेता अरबाज खान याच्या 'पिंच' या कार्यक्रमात खुलासा केला. सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी सांगत मी कधीच कोणाला चित्रीकरणासाठी वाट पाहायला लावली नव्हती असं त्याने स्पष्ट केलं. 

4/5

सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

सुनील आणि आपल्यामध्ये मतभेट वाढण्यास इतर व्यक्ती जास्त कारणीभूत असल्याचं स्पष्ट करत अनेक अफवांना त्यांनीच हवा दिल्याचं कपिलने स्पष्ट केलं. 'कोणी म्हटलं मी कोणा एका सहकाऱ्यावर बूट भिरकावला, तर कोणी म्हटलं टीमने माझ्यापूर्वी जेवून घेतल्यामुळे मी रागावलो होतो.... माझा चेहरा पाहून तरी तुम्हाला असं खरंच वाटतं का?', असं म्हणत या सर्व चर्चा अफवा असल्याचं त्याने स्पष्ट केलं. सुनील किंवा आपण स्वत: कधीच याविषयी वक्तव्य केलं नसल्याचं म्हणत बाहेरच्या वक्तींनी परसवलेल्या या अफवांवरच बातम्या लिहिल्या गेल्याचम म्हणत कपिलने नाराजी व्यक्त केली. 

5/5

सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादाविषयी कपिलचा मोठा खुलासा

वारंवार होणाऱ्या या नकारात्मक चर्चांमुळेच नैराश्य़ाने आपल्याला ग्रासलं आणि आपण मद्याच्या आहारी गेल्याचं कपिलने या मुलाखतीत सांगितलं. दोन मित्रांमध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा, तिसऱ्या किंवा कोणा बाहेरच्या व्यक्तीला यावर अफवा पसरवण्याची संधी देऊ नका, असं म्हणत कपिलने ही सर्व परिस्थिती आता पूर्ववत झाल्याचंही या कार्यक्रमात सांगितलं.