coronavirus : पुण्यात पोलिसांचं पथसंचलन

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढते आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1135वर पोहचली आहे.

Apr 08, 2020, 21:29 PM IST

पुण्यात 166, पुणे ग्रामीणमध्ये 6 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 17 कोरोनाबाधित आढळले आहेत.

1/7

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासोबतच, सतत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या उपद्रवी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी पुण्यात अनोखं पथसंचलन केलं. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे)

2/7

पुण्यातील कात्रज परीसरात हे पथसंचलन करण्यात आलं. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे)

3/7

पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे)

4/7

मंगळवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून संचार बंदी लागू करण्यात आली असून १४ एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे)

5/7

शहरातील मंगळवार पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, भवानी पेठ, कोंढवा, गुलटेकडी, स्वारगेट, कामगार पुतळा या भागात संचारबंदी आहे. या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने हा परिसर आधीच सील करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे)

6/7

अत्यावश्यक कारणाशिवाय या भागात पूर्णपणे संचारबंदी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे)

7/7

पुण्यात गेल्या २४ तासांत ८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झालाय. तर शहरात १२५ हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे)