Countdown Start... काही तासांतच चंद्रयान - 3 अंतराळात झेप घेणार ! 140 कोटी भारतीयांचं स्वप्न साकारणार

काही तासात चंद्र भारताचा होणार आहे. 14 जुलैला जेव्हा घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झालेली असतील तेव्हा भारत अंतराळात एक नवीन इतिहास रचेल. चंद्रयान - 3 अंतराळात झेप घेणार आहे. 

Jul 13, 2023, 20:43 PM IST

Chandrayaan-3 : 14 जुलै रोजी भारत एक मोठी ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटात इतिहास रचला जाईल. याच दिवशी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान-3 ला अंतराळात झेपवणार आहे. लाँचिंगची तयारी पूर्ण झाली आहे.तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची रंगीत तालीमही पूर्ण झालीय आणि रंगीत तालीम 100 टक्के यशस्वी ठरली आहे.

1/7

अवघ्या 615 कोटीत निर्माण झालेलं चंद्रयान-3 भारतासाठी इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश बनेल. 

2/7

यावेळी 5 च्या जागी 4 मोटर लावण्यात आलेत. सॉफ्टवेअरमध्येही बदल करण्यात आलेत. 

3/7

यावेळी ISROने चंद्रयानात 21 बदल केलेत. 

4/7

वर्ष 2019 मध्ये चंद्रयान-2 चं मिशन यशस्वी होता होता राहिलं. चंद्रयान 2 अंतराळात झेपावलं मात्र चंद्रावर त्याची लँडिंग होऊ शकली नाही आणि इस्रोचं स्वप्न अपूर्णच राहिलं. 

5/7

सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चंद्रयान-3 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. 

6/7

लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर केला जातोय. 

7/7

14 जुलैला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान लाँच केलं जाईल.