152 पेक्षा जास्त जागा लढवणार; भाजपच्या मित्रपक्षांची धाकधूक वाढली

लोकसभेत 45 तर विधानसभेत 152 जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट आहे. आमदार-खासदारांच्या शिबिरात बावनकुळेंचा निर्धार, जागावाटपावर फडणवीसांचा मात्र तडजोडीचा सूर दिसत आहे. 

Jul 13, 2023, 20:19 PM IST

BJP Mission 2024:  एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा कायम आहे, त्यात भाजपनं विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा दिलाय. या नाऱ्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांची धाकधूक वाढली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 152 हून अधिक जागा जिंकण्याचा नाराच भाजपनं दिलाय. इतकंच नाही तर लोकसभेला 350 हून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवण्यात आले आहे.

1/9

 भाजप मित्रपक्षांना नेमक्या किती सोडणार याबाबत उत्सुकता आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा पेच कायम असताना बावनकुळेंच्या १५२च्या घोषणेमुळे मित्रपक्षांची धाकधूक वाढलीय.

2/9

भाजपने 2014 मध्ये विधानसभेला 122 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये जागा घटून 105 वर आल्या...त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळविण्याची भाजपची रणनीती असल्याचं दिसतंय.

3/9

रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांनीही काही जागांची मागणी केली आहे. 

4/9

 अजित पवारांनी बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात 90 जागा लढवणार असल्याची घोषणा केलीय.

5/9

दोन्ही गटांना जेवढे आमदार तेवढ्याच जागा मिळणार का असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय.

6/9

शिंदे गटाचे अपक्षांसह 50 आमदार आहेत.  

7/9

शिंदे गटाचे अपक्षांसह 50 आमदार आहेत. 

8/9

152 पेक्षा जास्त जागा भाजप लढवणार असल्यामुळे मित्रपक्षांच्या वाट्याला 125 जागा येणार. 

9/9

152 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्धार भाजपने केला आहे.