शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

Mar 22, 2020, 15:11 PM IST
1/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

Corona व्हायरचा पादुर्भाव भारतातही वाढत चालला आहे. या परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये असणारं दहशतीचं वातावरणा आणि व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'जनता कर्फ्यू'चं आवाहन नागरिकांना केलं. रविवारी म्हणजेच २२ मार्च २०२०ला सकाळी ७ वाजल्यापासून या 'जनता कर्फ्यू'ला सुरुवात झाली. अतिशय गांभीर्याने नागरिकांनी पंतप्रधानांकडून देण्यात आलेली साद ऐकत या मोहिमेला पाठिंबा दिला. नेहमीच गजबललेली आणि वरदळ असणारी अनेक ठिकाणं या दिवशी भलतीच शांत दिसली.  कोरोनाची दहशत पाहता, हा व्हायरस देशातून हद्दपार करण्यासाठी देशवासिकांनीही हातभार लावला. अर्थात त्यांच्याच सहकार्यातून या व्हायरसचा नायनाट करता येणं शक्य होणार आहे. दरम्यान, 'जनता कर्फ्यू'च्या दिवशी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा हा शुकशुकाट एकदा पाहाच....   

2/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

मुंबईल शिवाजी पार्क हा परिसर कायमच गजबजलेला असतो. पण, जनता कर्फ्यूच्या दिवशी मात्र या परिसरात कमालीची शांतता पाहायला मिळाली. 

3/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

नागपूर येथील झाँशीची राणी चौकही असाच भकास दिसला. (छाया सौजन्य-  अमित त्रिपाठी) 

4/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

पश्चिम बंगाल येथील हावडा रेल्वे स्थानक, हावडा ब्रिज परिसर आणि इतरही बऱ्याच भागांमधील वरदळ लक्षणीयरित्या कमी झाली होती. 

5/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

चंदीगढ येथील बस आगारामध्येही कोणी फिरकलं नव्हतं. (छाया सौजन्य- खुर्शीद अहमद) 

6/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

ताजनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रा येथेसुद्धा दुकानं बंद ठेवण्यात आली. शिवाय नागरिकांनी जनता कर्फ्यूला भरभरून प्रतिसाद दिला. (छाया सौजन्य- शोभित चतुर्वेदी) 

7/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

दिल्लीतील संसद मार्ग येथेही काहीचं अशाच प्रकारचं वातावरण दिसलं.   

8/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

नेहमीच नागरिकांची गर्दी असणाऱ्या नोएडा गेट परिसरामध्ये रस्त्यावरुन कोणीही फिरकताना दिसलं नाही. (छाया सौजन्य- वरुण भसीन) 

9/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

संपूर्ण देशातूनच नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी श्रीनगर येथील लाल चौकातही कमालीची शांतता दिसली.   

10/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

हैदराबादमध्येही पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाचा गांभीर्याने विचार करत नागरिकांनी घरी थांबण्यालाच प्राधान्य दिलं.   

11/11

शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

जयपूर रेल्वे स्थानक परिसरातही शांतता पाहायला मिळाली.