इंग्लंड विकेटकिपर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या प्रेमात, साखरपुडाही केला... फोटो व्हायरल

Amy Jones Piepa Cleary Engaged : ऑस्ट्रेलियन गोलंदाज पीपा क्लेरी आणि इंग्लंडची विकेटकिपर-बॅटर एमी जोन्स यांनी साखरपुडा केला आहे. दोघांनी साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Jul 24, 2024, 19:07 PM IST
1/8

इंग्लंड विकेटकिपर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या प्रेमात, साखरपुडाही केला... फोटो व्हायरल

2/8

इंग्लंडची विकेटकिपर-बॅटर एमी जोन्स आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज पीपा क्लेरी यांनी साखरपुडा केला आहे. दोघांनी साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/8

एमी जोन्स आणि पीपा क्लेरी या चांगल्या मैत्रीणी आहेत. मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्यानंतर दोघींनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. एमी जोन्स आणि पीपा क्लेरी यांनी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एकमेकांच्या बोटात रिंग घातली.

4/8

क्लेरी आणि एमी यांची पहिली ओळख महिला बिग बॅश लीगमध्ये झाली. बिग बॅश लीगमध्ये या दोघी पर्थ स्कोचर्स संघाकडून खेळत होत्या. यातूनच दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांची घट्ट मैत्री झली. एमी आणि क्लेरीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. 

5/8

एमी जोन्सने इंग्लंडसाठी 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.  एमीने 6 कसोटीत 116 धावा केल्या आहेत. तर 91 एकदिवसीय सामन्यात 1951 धावा तिच्या नावावर आहे. 

6/8

एमीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 94 हा सर्वाधिक स्कोर आहे. 2013 मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याशिवाय एमी तब्बल 107 टी20 सामने खेळली आहे. यात तीने 1515 धाावा केल्यात. 

7/8

तर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज पीपा क्लेरीने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पीपा टी20 स्पेशलिट खेळाडू म्हणून ओळखली जाते. तीने 89 सामन्यात आतापर्यंत 62 विकेट घेतल्या आहेत.

8/8

याआधी ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शट आणि जेस होलियोकने लग्न केलं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जीसा जोनासेनने साराय वियर्नबरोबर लग्न केलं होतं.