क्रिकेट जगतातून मोठी बातमी! शिखर धनवचं टीम इंडियात होणार पुनरागमन, थेट कर्णधारपदाची जबाबदारी?

Cricket : 12 जुलैपासून टीम इंडिया (Team India) वेस्ट इंडिजच्या (West Indies) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी20 सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) कसोटी (Test) आणि एकदिवसीय संघाची (ODI) घोषणा केली आहे. पण या संघातून भारतीय संघाचा गब्बर अर्थात शिखर धवनला (Shikhar Dhavan) वगळण्यात आलं आहे. संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आल्याने शिखर धवनची क्रिकेट कारकिर्द धोक्यात आल्याचं बोललं जात होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार शिखर धवनचं लवकरच टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. 

| Jun 26, 2023, 14:43 PM IST
1/5

टीम इंडियाच गब्बर अर्थात शिखर धवनला विंडिज दौऱ्यातून वगळण्यात आलं आहे. पण लवकरच शिखर धवन टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिखर धवन आशियाई गेम्समध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. 

2/5

आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ इथं होणार आहेत. बीसीसीआय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवणार असल्याचे बोललं जात आहे. 

3/5

आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाचा भाग असलेले खेळाडू 2023 च्या विश्वचषकात खेळू शकणार नाहीत. बीसीसीआय आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनमध्ये बी टीम पाठवणार असून त्यामध्ये पृथ्वी शॉ, रिंकू सिंग, तिलक वर्मा यांची नावे असू शकतात.

4/5

शिखर धवनला यापूर्वीही भारत 'बी' संघाचा कर्णधार म्हणून पाठवण्यात आलं होत. टीम इंडियाने 2021 मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता, त्याचवेळी भारताची बी टीम श्रीलंकेला पाठवण्यात आली होती.

5/5

शिखर धवन विश्वचषक संघाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्याचं मानले जात आहे.  आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलची सलामीची जागा घेतली आहे. अशा स्थितीत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या विजयाची जबाबदारी शिखर धवनवर पडण्याची शक्यता आहे.