ICC कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंची बल्ले बल्ले, टॉप-10 यादीत युवा फलंदाजाचा समावेश

ICC Test Ranking : भारतीय क्रिकेट संघातील फलंदाजांना धर्मशाला कसोटी सामन्यापूर्वी आयसीसीने खुशखबरी दिली आहे. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा जलवा पाहायला मिळतोय. युवा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वालचा पहिल्यांदाच क्रमवारीत टॉप-10 मध्ये समावेश झाला आहे.

| Mar 06, 2024, 15:04 PM IST
1/7

ICC ने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाललने टॉप-10 मध्ये एन्ट्री केली आहे. यशस्वी दोन स्थानांची मजल मारत 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी क्रमवारीत यशस्वीचा पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये समावेश झाला आहे. 

2/7

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेलाही ताज्या क्रमवारीत 2 स्थानांचा फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा आता अकराव्या स्थानावर आहे. 

3/7

इंग्लंडविरुद्धच्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत खेळत नसतानाही विराट कोहली टॉप-10 मध्ये आपली जागा टिकवून आहे. विराटच्या खात्यात 744 पॉईंट जमा असून तो आठव्या क्रमांकावर आहे. 

4/7

गेले जवळपास वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला ऋषभ पंतही या यादीत कायम आहे. पंत चौदाव्या स्थानावर आहे. तर युवा फलंदाज शुभमन गिल 31 व्या स्थानावर आहे. 

5/7

आयसीसी कसोटी फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा केन विल्यम्सन पहिल्या स्थानावर आहे. विल्यमसनच्या खात्यात तब्बल 870 पॉईंट जमा आहेत. तर इंग्लंडच्या जो रुटने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला मागे टाकत दुसरा क्रमांका पटकावला आहे. 

6/7

आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या यादीत तीन भारतीयांचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्याच्या खात्यात 867 पॉईंट जमा आहेत. 

7/7

तर दुसऱ्या स्थानावर महान फिरकी गोलंदाज आर अश्विन आहे. धर्मशाला कसोटी हा अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीतील शंभरावा सामना असणार आहे. तर या यादीत टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे.