Cricket : विराट कोहलीच्या सुवर्ण अध्यायाचा शेवट? ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसऱ्या कसोटीत फेल

Cricket : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (India vs Australi Test Series) खेळवली जात आहे. पण या मालिकेत टीम इंडियाची (Team India) रन मशीन अर्थात विराट कोहलीची (Virat Kohli) कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यातल्या पाच डावांमध्ये विराटला केवळ 111 धावा करता आल्या आहेत. इतकंच नाही तर मार्च 2022 पासून कसोटी सामन्यात त्याला एक अर्धशतकही करता आलेला नाही. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात त्याने शेवटचं अर्धशतक केलं होतं. कर्धणार म्हणून त्याचा हा शेवटचा कसोटी सामना होता.

Mar 03, 2023, 14:32 PM IST
1/8

तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग कोहलीचा रेकॉर्ड शानदार ठरला आहे. कांगारुंविरुद्ध विराटने 23 सामन्यात 1794 धावा केल्या असून यात 7 शतक आणि 5  अर्धशतकांचा समावेश आहे. 

2/8

पण यानंतर गेल्या काही सामन्यांपासून कसोटी सामन्यात एका-एका धावेसाठी झुंजताना दिसत आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील त्याच्या सुवर्ण युगाचा अंत झाला का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

3/8

एशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरोधात शतक ठोकत त्याने तीन वर्षांतील शतकांचा दुष्काळ संपवला होता. पण कसोटी सामन्यात चाहते बराच काळ त्याच्या शतकाच्या प्रतीक्षेत आहेत.

4/8

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकून आता बराच कालावधी लोटला आहे. 2019 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध शतक केलं होतं. त्यानंतर जवळपास चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. 

5/8

आता घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यातही त्याला धावांसाठी झगडावं लागतंय. पहिल्या कसोटीत 12 धावा, दिल्लीत कसोटीत 44 आणि 20 धाव आणि आता इंदूर कसोटीत 13 आणि 22 धावा. अशी त्याची कामगिरी आहे. 

6/8

विराट कोहलीने 2011 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून 2019 पर्यंत त्याने 84 कसोटी सामन्यात 7202 धावा केल्या आहेत. 

7/8

84 कसोटी सामन्यात विराट कोहलीने एकूण 27 शतकं केली आहेत. पण नोव्हेंबर 2019 पासून त्याने खेळलेल्या 23 कसोटी सामन्यात केवळ 1028 धावा केल्या आहेत. यात एकही शतक नाही.

8/8

या कामगिरीचा फटका त्याला आयसीसी कसोटी क्रमवारीतही बसला आहे. ताज्या क्रमवारीत तो टॉप10 च्याही बाहेर आहे. सध्या 665 रेटिंग पॉईंटसह तो 17 व्या क्रमांकावर आहे.