शर्माजींच्या मुलीची कमाल! कसोटी सामन्यात दीप्तिसमोर इंग्लिश संघ गडगडला... भारत विजयाच्या उंबरठ्यावर

IND W vs ENG W Test: भारत आणि इंगंड महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव कसोटी क्रिकेट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. भारताकडे तब्बल 478 धावांची आघाडी असून भारतीय महिला संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हा सामना जिंकत हरमिनप्रीत कौरच्या टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी आहे.

| Dec 15, 2023, 21:17 PM IST
1/7

शर्माजींचा मुलगा म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा अनेकदा चर्चेत असतो. पण आता शर्माजींची मुलगीही चर्चेत आली आहे. भारती महिला क्रिकेट संघाची ऑलराऊंडर दीप्ति शर्माने  (Deepti Sharma) इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात धमाल उडवून दिली आहे. रोहित आणि दीप्ति भाऊ-बहिण नाहीएत, पण दोघंही भारीय क्रिकेटसाठी दमदार कामगिरी करतायत. भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात भारताने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. 

2/7

दीप्ति शर्माच्या ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने इंग्लंडला नाकीनऊ (IND W vs ENG W) आणले. कसोटीचे आणखी दोन दिवस बाकी आहेत आणि टीम इंडियाकडे 478 धावांची आघाडी आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकत इतिहास रचण्याची संधी भारतीय महिला संघाकडे आहे. 

3/7

उत्तरप्रदेशच्या आगरा इथं राहाणाऱ्या दीप्ती शर्माच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश लोटांगण घातलं. भारतीय संघाच्या फलंदाजीतही दीप्तीने 67 धावांचं योगदान दिलं. पहिल्या डावात भारताने 428 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर गोलंदाजीतही दीप्तीने कमाल केली. 5.3 षटकात 4 मेडन ओव्हर टाकत अवघ्या सात धावात 5 विकेट घेतल्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 136 धावात आटोपला.

4/7

इंग्लंडची सुरुवातीला 3 विकेटवर 108 धावा सुस्थिती होती. पण यानंतर दीप्तीने इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडलं. पुढच्या दहा धावातच इंग्लंडने सहा विकेट गमाववले. दीप्तीला स्नेह राणाने चांगली साथ दिली. तीने 2 विकेट घेतल्या. तर रेणुका सिंह आणि पूजा वस्त्रकारने प्रत्येकी एक विकेट घेतली.

5/7

भारताने पहिल्या इनिंगमध्ये 292 धावांची आघाडी घेतली. पण इंग्लंडला फॉलोअन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 6 विकेटवर 186 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाकडे एकूण 478 धावांची आघाडी आहे. दिवस संपला त्यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर 44 तर पूजा वस्त्रकार 17 धावांवर खेळत होत्या. 

6/7

भारताच्या दुसऱ्या डावात स्मृती मंधाना (26) आणि शेफारी वर्माने (33) 61 धावांची भागिदारी करत चांगली सुरुवात करुन दिली. पण इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी झटपट विकेट घेत टीम इंडियाचा निम्मा संघ गारद केला. इंग्लंडच्या चार्ली डीनने 68 रन पर 4 विकेट आणि अुभवी सोफी एक्लेस्टोनने 76 रन पर 2 विकेट घेतल्या

7/7

भारत आणि इंग्लंड महिला संघातील हा कसोटी क्रिकेट सामना नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडिअमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण 19 विकेट गेल्या. यातल्या पंधरा विकेट या केवळ फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.