IPL 2023 : बिग बींचा आवाज, 12 भाषा आणि बरेच काही.... आयपीएल 2023 प्रेक्षकांसाठी ठरणार खास
IPL 2023 : भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान कसोटी (India vs Australia Test Series) मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI Series) रंगणार आहे. पण आता क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे ती इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची (IPL 2023). आयपीएलचा हा सोळावा हंगाम असून यंदा दहा संघ खेळणार आहेत. यंदा खेळाडूंची अदलाबदल झाली असून कोणते खेळाडू कोणत्या संघातून खेळणार हेही निश्चित झालं आहे. पण यंदाची आयपीएल प्रेक्षकांसाठीही खास असणार आहे. बीसीसीआय (BCCI) आणि जिओने (JIO) या स्पर्धेत मोठे बदल केले आहेत.