Hera Pheri 3 : पुन्हा होणार हास्याचा धमाका..! ‘हेरा फेरी 3’ च्या सेटवरचा फोटो व्हायरल, पाहा PHOTO

Hera Pheri 3: 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' (Hera Pheri)  या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून सध्या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Feb 22, 2023, 16:34 PM IST
1/5

काही महिन्यांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते. आता अखेर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून या त्रिकुटांचा फोटो व्हायरल होत आहे. 

2/5

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये परेश रावल बाबुभाईच्या गेटअपमध्ये तर अक्षय कुमार राजुच्या गेटमध्ये दिसत आहे. सुनील शेट्टी मात्र साध्याच कपड्यांमध्ये दिसत आहे.

3/5

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “अखेर हे त्रिकुट एकत्र आले,” दुसऱ्याने लिहले आहे “बॉलिवुडच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कॉमेडी असेल” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.    

4/5

तिसऱ्याने लिहले आहे “एवढ्या वर्षांनी बाबुराव, श्याम आणि राजू परत आले आहेत. मी खूप आनंदी आहे”. एकूणच चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.

5/5

फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला. मूळ ‘हेरा फेरी’ हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2006 मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी 2’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी 3’ची आतुरतेने वाट बघत आहेत.