युवराज सिंग आणि हेजल किचचा मुलगा ओरियन झाला एक वर्षाचा, सोशल मीडियावर शेअर केले क्यूट फोटो

Yuvaraj Sinh-Hejal Kich Son Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू आणि सिक्सर किंग युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच यांचा मुलगा ओरियन याचा पहिला वाढदिवस साजरा करतायत. यानिमित्ताने त्यांनी आपल्या मुलाचे क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. युवराज आणि हेजल किचने 2016 मध्ये लग्न केलं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटात हेजल किचने अभिनय साकारला होता. शिवाय बिग बॉस आणि झलक दिखला जा या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती. लग्नानंतर हेजल चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. 

Jan 25, 2023, 22:01 PM IST
1/7

युवराज आणि हेजल किच यांना 25 जानेवारी 2022 रोजी पूत्ररत्न झालं. त्यांना आपल्या मुलाचं नाव ओरियन असं ठेवलं आहे. ओरियनचा अर्थ नक्षत्र असा होतो.

2/7

एका मुलाखतीत युवराज सिंहने आपल्या मुलाचा उल्लेख करत आपला मुलगा आपल्यासाठी एक तारा असल्याचं म्हटलं होतं. 

3/7

ओरियनच्या पहिल्या वाढदिवसाला हेजल किचने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंवर त्याचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत तीने एक कॅप्शनही लिहिला आहे. यात तीने म्हटलंय 'मी दररोज देवाचे आभार मानतो की तू मला तुझी आई म्हणून निवडले आहे. माझ्या गोंडस मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

4/7

माझा विश्वास बसत नाही की तुम्ही 1 वर्षाचा झालास. येणारा प्रत्येक दिवस तू मला आनंद देत आहेस, असं हेजलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

5/7

एका फोटोत ओरियनने मिकी माऊसचा ड्रेस परिधान केला असून यात तो खूपच क्यूट दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

6/7

फादर्स डेच्या दिवशी हेजलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात ओरियन आपल्या वडिलांच्या म्हणजे युवराजच्या छातीवर निवांत झोपला होता. याबरोबरच हेजलने ओरियनच्या आजोबांबरोबरचाही एक फोटो शेअर केला होता.

7/7

युवराज सिंहने 2000 मध्ये टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2019 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या विजयात युवराज सिंहचा मोलाचा वाटा होता. तर 2007 मधल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये युवराजने इंग्लंडविरुद्ध एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा रेकॉर्ड केला होता.