Birthday नंतर एम एस धोनीचा लूकच बदलला, चाहते हैराण, सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो...

MS Dhoni New Look : टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने (MS Dhoni) 7 जुलैला आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या (Birthday) दोन दिवसांनंतर धोनी अचानक चेन्नई दौऱ्यावर आला. यावेळी विमानतळावर (Chennai Aireport) त्याचा नवा लूक पाहिला मिळाला. धोनीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

| Jul 10, 2023, 15:27 PM IST
1/5

MS Dhoni New Look : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या एम एस धोनने 7 जुलैला आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. आपला वाढदिवस त्यने हटके स्टाईलमध्ये साजरा केला. आपल्या पाळीव श्वानांबरोबर केक कापत त्याने सेलिब्रेशन केलं. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. याला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती.

2/5

आता धोनीचा नवा फोटो सोशल मीडियावर वेगावने व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी नव्या लूकमध्ये दिसतोय. वाढदिवासनंतर धोनीचा नवा लूक पाहून चाहते हैराण झाले आहे. त्याच्या या फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळतेय.

3/5

हा फोटो इन्स्टाग्रामवर क्रिकसुपर फॅन या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एम एम धोनी आज अचानक चेन्नई दौऱ्यावर आला. सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात धोनी चेन्नई विमानतळावरच पोहोचताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पण यावेळी चाहत्यांना एक सुखद धक्काही बसला. एका नव्या लूकमध्ये पाहिला मिळाला. 

4/5

धोनीने केस कलर केले असून कपाळावर केसांच्या बटा घेतल्या आहेत. धोनीचा हा नवा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. धोनीने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. त्याच्या मागे लवन्या एक पोस्टर घेऊन उभी आहे. धोनीच्या नव्या लूकने चाहत्यांना 2007 चा धोनी आठवला. चेन्नई विमानतळवार धोनीचं जल्लोषात स्वागत करण्यता आलं. 

5/5

एमएस धोनी आपल्या नव्या प्रोडक्शन हाऊसच्या पहिला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नईत आला होता. या चित्रपटाचा नाव  'लेट्स गेट मेरिड' असं आहे.