बचत हवी तर अशी! ब्रेझा, पंचला टक्कर देतेय ह्युंडाईची नवी कार; किंमत आता पाहून घ्या

Hyundai Exter : तुमचं उत्तर जर 'हो' असेल तर, ह्युंडईनं तुमच्यासाठी एक अफलातून पर्याय आणला आहे. हा पर्याय तुम्हाला कार चालवण्याचा एक अद्वितीय अनुभव देऊन जाईल. 

Jul 10, 2023, 12:53 PM IST

Hyundai Exter : भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खासगी वाहनधारकांची संख्या मोठ्या फरकानं वाढली आहे. तुम्हीही कार खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांपैकी एक आहात का? 

 

1/7

भारतीय ग्राहक

Hyundai Exter launched in india know features price and best deal

Hyundai Exter : भारतातील रस्ते, भारतीय ग्राहकांची वेतन मर्यादा या आणि अशा अनेक गोष्टी अंदाजात घेत ह्युंडई या कंपनीकडून भारतीय कारप्रेमींच्याच दृष्टीनं डिझाईन केलेली Exter ही एसयुव्ही लाँच केली जात आहे. 

2/7

स्वस्त एसयुव्ही

Hyundai Exter launched in india know features price and best deal

आतापर्यंत ह्युंडईच्या एसयुव्हींपैकी ही सर्वाधिक स्वस्त एसयुव्ही आहे. पाच विविध व्हेरिएंटमध्ये ही कार तुम्हाला उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 40 वेगवेगळे फिचर्स मिळणार आहेत.   

3/7

बुकिंग अमाऊंट

Hyundai Exter launched in india know features price and best deal

1.2 लीटर कप्पा इंजिन असणाऱ्या ह्युंडई एक्स्टरसाठी 11 हजार रुपयांची बुकिंग अमाऊंट द्यावी लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं ही कार बुक करू शकता. त्यामुळं ही एक आनंदाचीच बाब.   

4/7

कारची किंमत

Hyundai Exter launched in india know features price and best deal

किमतीचं सांगावं तर, या कारची एक्स शोरूम किंमत 6 ते 10 लाख रुपयांच्या घरात आहे. ही देशातील सर्वात स्वस्त एसयुव्ही असेल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.   

5/7

इंजिन

Hyundai Exter launched in india know features price and best deal

ह्युंडई एक्स्टरच्या इंजिनमधूनन 83hp ची पॉवर आणि 114Nm चा टॉर्क जनरेट केला जाईल. या कारमध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिर गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

6/7

सुरक्षितता

Hyundai Exter launched in india know features price and best deal

प्रवाशांच्या गरजांसोबतच कंपनीकडून त्यांच्या सुरक्षिततेलाही केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. कारमध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. तर, कारच्या पाचही व्हर्जनमध्ये जास्तीत जास्त सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. 

7/7

किंमत आणि फिचर्स

Hyundai Exter launched in india know features price and best deal

किंमत आणि फिचर्स पाहता आता तुम्ही येत्या काळात नवी कार खरेदी करु इच्छिता आणि तुम्हाला बजेटचीही चिंता सतावत असेल तर हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. (छाया सौजन्य- ह्युंडई)