टीम इंडियात 'या' पाच दिग्गजांसाठी दरवाजे बंद, आयपीएलमध्येही 'गेम ओव्हर'

Team India : येत्या काही दिवसात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयची निवड समिती लवकरच टीम इंडियाची घोषणा करणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह हे दिग्गज या मालिकेत खेळताना दिसणार आहेत.

| Aug 30, 2024, 21:02 PM IST
1/7

भारतीय क्रिकेट संघाने नुकताच श्रीलंका दौरा केला होता. या दौऱ्यात तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवण्यातआले. टी20 मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. पण एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृ्त्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला 2-0 असा पराभव पत्करावा लागला.

2/7

श्रीलंकेचा दौरा संपल्यानंतर टीम इंडियाला तब्बल 43 दिवसांचा ब्रेक मिळालाय. ब्रेकनंतर 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयची निवड समिती लवकरच टीम इंडियाची घोषणा करेल. विराट, रोहित बरोबरच जयस्वाल, सर्फराज खान या युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. 

3/7

पण असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. या खेळाडूने एक काळ गाजवल होता. पण सध्या ते टीम इंडियातून बाहेर आहेत. यातलं पहिलं नाव म्हणजे चेतेश्वर पुजारा. चेतेश्वर टीम इंडियासाठी आपल्या शेवटचा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळला होता. चेतेश्वर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. आता त्याच्या जागी शुभमन गिलल या क्रमांकावर खेळतो. 

4/7

पुजारानंतर दुसरा खेळाडू म्हणजे मराठमोळा अजिंक्य रहाणे. गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अजिंक्य रहाणेने टीम इंडियात पुनरागमन केलं. आयपीएल 2023 मध्येही त्याने दमदार कामगिरी केली. पण यानंतर त्याची कामगिरी ढासळली. आता त्याचा जागी संघात श्रेयस अय्यर, सर्फराज खान यासारखे युवा फलंदाज आलेत. 

5/7

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवही गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. उमेशने टीम इंडियासाठी आपला शेवटचा सामना 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. पण आता टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झालेत. संघात मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग असे ताज्या दमाचे गोलंदाज आले आहेत. 

6/7

महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमधअये ऋद्धिमान साहाला टीम इंडियात संधी मिळाली. पण त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. साहा टीम इंडियासाठी 2021 मध्ये न्यूझीलंविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. आता ईशान किशन, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत या युवा विकेटकिपरने शर्यतीत बाजी मारली आहे. 

7/7

टीम इंडियाच्या कसोटी संघाचा सर्वात महत्ताचा खेळाडू होता तो म्हणजे वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा. पण आत 35 वर्षांच्या ईशांतच्या गोलंदाजीची धार कमी झाली आहे. 2021 मध्ये तो टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. आता त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.