....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; 'ही' ट्रिक वापरा आणि 'तो' कोण आहे शोधून काढा

आज एका खास ट्रिकबद्दल जाणून घ्या जिचा वापर करुन तुम्ही तुमचं Gmail खातं अजून कोणी वापरत आहे का याची माहिती मिळवू शकता.   

| Aug 30, 2024, 19:55 PM IST

आज एका खास ट्रिकबद्दल जाणून घ्या जिचा वापर करुन तुम्ही तुमचं Gmail खातं अजून कोणी वापरत आहे का याची माहिती मिळवू शकता. 

 

1/9

Gmail सर्व्हिसचा युजरबेस

Gmail सर्व्हिसचा युजरबेस

गुगलच्या जीमेलचा एक मोठा युजरबेस आहे. भारतासह जगभरात त्यांचे करोडो युजर्स आहेत. इंटरनेटचा वापर करणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडे जी-मेल खातं आहे.   

2/9

Gmail च्या अनेक सेवा

Gmail च्या अनेक सेवा

Gmail च्या मदतीने तुम्ही खासगी फोटोंपासून ते ओटीपीपर्यंत अनेक गोष्टी अॅक्सेस करु शकता. त्यामुळे जर Gmail कोणी हॅक केलं तर फार मोठी समस्या होऊ शकते.   

3/9

जाणून घ्या खास ट्रिक

जाणून घ्या खास ट्रिक

दरम्यान आज एका खास ट्रिकबद्दल जाणून घ्या जिचा वापर करुन तुम्ही तुमचं Gmail खातं अजून कोणी वापरत आहे का याची माहिती मिळवू शकता.   

4/9

Recent Activity वर लक्ष ठेवा

Recent Activity वर लक्ष ठेवा

Gmail मध्ये तुम्ही सहजपण Recent Activity तपासू शकता. यासाठी Gmail ओपन करा, यानंतर ईमेलला स्क्रोल डाऊन करुन सर्वात वरती डाव्या बाजूला जावा.  

5/9

यानंतर युजर्स डिटेल्सवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला Last Account Activity वर तुमच्या अकाऊंटचा वापर कुठे कुठे झाला याची माहिती मिळेल.   

6/9

Linked Devices तपासा

Linked Devices तपासा

Gmail मध्ये एक खास पर्याय आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्या डिव्हाईसवर आणि कुठे लॉग इन झालं होतं याची माहिती मिळेल. यासाठी सेटिंगमध्ये जावं लागेल.   

7/9

फॉलो करा ही प्रक्रिया

फॉलो करा ही प्रक्रिया

आपल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा, यानंतर Manage Your Google Account वर क्लिक करा. यानंतर Security मध्ये जा.   

8/9

कुठे कुठे लॉग इन

कुठे कुठे लॉग इन

यानंतर युजर्सला  Your Devices मधे सध्या हे अकाऊंट कुठे कुठे लॉग इन आहे याची माहिती मिळेल.   

9/9

थर्ट पाटी अॅप अॅक्सेस पाहा

थर्ट पाटी अॅप अॅक्सेस पाहा

Gmail युजर्स Security टॅबमध्ये Third Party Apps with account access वर क्लिक करुन पाहू शकतात की कोणते अॅप्स तुमच्या Gmail चा वापर करत आहेत.