WTC मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया, मग अंतिम सामना इंग्लंडमध्ये का? समोर आलं मोठं कारण
WTC Final : दोन वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) चांगली कामगिरी करत टॉपवर असणाऱ्या दोन संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळवला जातो. यात विजेती टीम टेस्ट चॅम्पियन ठरते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पहिल्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) टीम आमने-सामने होत्या. तर दुसऱ्या हंगामात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) अंतिम सामना खेळवला जात आहे. 7 ते 14 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर (Oval Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. पण हा सामना इंग्लंडमध्येच का खेळवला जातोय असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय.