तेंडुलकरपेक्षा कमी वयात रणजीत पदार्पण करणाऱ्या छोट्या सचिनची सर्वत्र चर्चा

रणजी ट्रॉफीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी बिहारचा वैभव सुर्यवंशी चर्चेचा विषय बनला.  

Jan 05, 2024, 17:23 PM IST

 

 

1/8

रणजी ट्रॉफीचा नवा सिजव सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे मैदानात आहेत. पण सर्वात मोठी चर्चा आहे ती बिहारच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची. वयाच्या14 व्या वर्षी त्यांनी फर्स्ट क्लास डेब्यू केले. बिहारचा संघ आपल्या होम ग्राऊंड मोईनुल हक स्टेडियमवर मुंबई विरुद्ध सामना खेळत आहे.   

2/8

या सामन्यात वैभवला पदार्पणाची कॅप मिळाली. फर्स्ट क्लास डेब्यूच्या वेळी सचिन तेंडुलकर वैभवपेक्षा वयाने मोठा होता. सचिनने 15 वर्षे 232 दिवसांच्या वयात पदार्पण केले.  

3/8

वैभवच्या खरे वयाबद्दल वाद : वैभव सूर्यवंशीच्या खरे वयावरून वाद सुरू आहे. बीसीसीआयच्या अधिकृत साइटनुसार, वैभवने वयाच्या 12 वर्ष, 9 महिने आणि 10 दिवसांमध्ये पदार्पण केले.   

4/8

वैभवचे वय देखील ESPNcricinfo या वेबसाईटवर लिहिलेले आहे. पण याच दरम्यान वैभवची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ही मुलाखत आठ महिन्यांपूर्वीची आहे.  

5/8

या मुलाखतीत तो स्वत: सांगत आहे की, 27 सप्टेंबरला मी 14 वर्षांचा होणार आहे. त्यानुसार, पदार्पणाच्या दिवशी त्याचे वय 14 वर्षे, 3 महिने आणि 9 दिवस आहे.  

6/8

वैभव नुकताच भारताच्या अंडर-19 ब संघाचा भाग होता ज्याने चार संघाची डॉमेस्टिक स्पर्धेत भाग घेतला होता ज्यात इंग्लंड आणि बांगलादेशच्या युवा संघांचाही समावेश होता.   

7/8

त्याने पाच सामन्यात 177 धावा केल्या. यात दोन अर्धशतकांच्या खेळीचाही समावेश होता. सूर्यवंशीने विनू मांकड ट्रॉफी 2023 मध्येही चमकदार कामगिरी केली. पाच सामन्यांत 393 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणारा आठवा खेळाडू होता. बिहार अंडर-19 संघाच्या झारखंडविरुद्धच्या कूचबिहार ट्रॉफी सामन्यातही त्याने 151 आणि 76 धावा केल्या.  

8/8

वैभव सूर्यवंशी हा डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. तो बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने वयाच्या सहाव्या वर्षी खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि वयाच्या सातव्या वर्षी क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश केला, जिथे त्याने माजी रणजी क्रिकेटपटू मनीष ओझा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.