मृत्यूला दिलाय चकवा; गोळीबारही या खेळाडूंना करू शकला नाही ‘OUT’

पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्यावर काल हल्ला झाला. रॅलीमध्ये झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले. सुदैवाने ही दुर्घटना त्यांच्या जीवावर बेतली नाही. मात्र इम्रानसह क्रिकेट जगतात काही खेळाडू आहेत, ज्यांच्यावर गोळीबार झाला होता, पण ते मृत्यूला चकवा देण्यात या खेळाडूंना यश मिळालंय.

Nov 04, 2022, 23:19 PM IST
1/4

तिलन समरावीरा

2009 साली पाकिस्तानमध्ये श्रीलंकन ​​क्रिकेट टीमवर झालेल्या हल्ल्यात श्रीलंकेचा क्रिकेटर तिलन समरावीरा जखमी झाला होता. यावेळी एक गोळी त्याच्या मांडीत घुसली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. यानंतर त्यांना बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं.

2/4

एहसान राजा

श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या हल्ल्यात माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि अंपायर एहसान राजा हे देखील जखमी झालेले.. त्यांना दोनदा गोळी लागली होती. त्यावेळी त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेव्हा ते मृत्यूशी झुंज जिंकले होते.

3/4

एंड्रयू हॉल

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू हॉलला यांना 1999 मध्ये एटीएम मशीनच्या बाहेर गोळ्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांच्या हातावर गोळी लागली होती. 

4/4

रणजीत सिंह

टीम इंडियाचा महान क्रिकेटपटू रणजित सिंग 1915 मध्ये शिकार करताना गोळी लागली होती. यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याला गोळी लागली. त्यांनी यावेळी एक डोळा गमावला.