Paris Olympic 2024 : क्रिकेटरच्या लेकानं ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाय

Cricketer son wins gold medal at Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वेस्ट इंडिजचा माजी स्टार क्रिकेटर विंस्टन बेंजामन याच्या मुलाने म्हणजेच राय बेंजामिन याने इतिहास रचला आहे.

| Aug 11, 2024, 20:29 PM IST
1/5

राय बेंजामिन

राय बेंजामिन याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. पण राय याने वेस्ट इंडिजसाठी नाही तर अमेरिकेसाठी गोल्ड मेडल पटकावलं.  

2/5

4 × 400 मीटर रिले

पुरूषांच्या 4 × 400 मीटर रिले स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत गोल्ड मेडलला गवसणी घातली. यावेळी त्याने नवा विक्रम रचला.

3/5

अशक्य कामगिरी

400 मीटरच्या अडथळ्याच्या स्पर्धेत क्रिस्टोफर बेली, वर्नोन नॉरवुड आणि ब्राईस डेडमॉन यांच्यासोबत अशक्य अशी कामगिरी करून दाखवली.  

4/5

नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड

2 मिनिट 54.43 सेकंदात आव्हान पार करून राय बेंजामिन याने नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला आहे. याआधी राय बेंजामिन याने टोकियो ऑलिम्पिक्समध्ये रौप्य पदक पटकावलं होतं.

5/5

वेस्ट इंडिजचा माजी स्टार क्रिकेटर विंस्टन बेंजामन याने 1986 ते 1996 या काळात क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे. एकूण 21 कसोटी सामने आणि 85 वनडे सामने खेळत 161 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.