Cricketers Holi : क्रिकेटर्स आणि होळी कनेक्शन, सप्तरंगात रंगले भारतीय क्रिकेटर्स, पाहा Photo

Cricketers Holi : होळी म्हणजे रंगांचा उत्सव. संपूर्ण देशभरात आज होळीचा सण (Holi Festival) मोठ्या उत्‍साहात साजरा केला जात आहे. सप्‍तरंगात न्‍हाऊन निघण्‍याचा हा सण. लहान असो की वृद्ध, पुरुष असो की महिला, सर्वच वयोगटातील लोक होळी, रंगपंचमी आनंदाने साजरी करतात. याला क्रिकेटर्स (Cricketers) तरी अपवाद कसे असतील. बराच वेळा सामन्यांमुळे किंवा दौऱ्यांमुळे भारतीय क्रिकेटर्सना रंगपंचमी (Rang Panchami) साजरी करता येत नाही. पण वेळ मिळेल तसा किंवा कुंटुंबाबरोबर असताना हे क्रिकेटर्स रंगपंचमी दणक्यात साजरी करतात. याला परदेशी खेळाडूही अपवाद नाहीत.

Mar 07, 2023, 13:58 PM IST
1/8

सचिनने दिल्या होळीच्या शुभेच्छा

मराठमोळा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रत्येक सण उत्साहात साजरा करतो. रंगपंचमी हा त्याचा आवडा सण. होळी आणि रंगपंचमीनिमित्ताने सचिन आपल्या चाहत्यांना नेहमीच शुभेच्छा देतो. होळी खेळतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

2/8

पांड्या कुटुंबाची रंगपंचमी

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याही आपल्या कुटुंबाबरोबर रंगपंचमी साजरी करतो. हार्दिक पांड्याने रंगपंचमीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हार्दिकबरोबर त्याची पत्नी, भाऊ कुणाल आणि त्याची पत्नी दिसत आहे. 

3/8

मित्रांबरोबर रंगपंचमी

टीम इंडियाचे तीन स्टार खेळाडू के. एल. राहुल, हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या खूप चांगले मित्र आहेत. तिघांचं जबरदस्त बॉण्डिंग आहे. तिघेही रंगपंचमीचा खूप आनंद घेतात.

4/8

हरभजनची कुटुंबासोबत रंगपंचमी

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही पत्नी गीता बसरा आणि मुलीबरोबरचा रंगपंचमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

5/8

भुवनेश्वर कुमारची रंगपंचमी

भारताचा वेगवान गोलंदाज दीपर चहरनेही आपला रंगपंचमीचा फोटो शेअर केला आहे. तर सध्या ब्रेकवर असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दरवर्षी होळीच्या निमित्ताने रंग खेळतानाचे फोटो शेअर करतो.

6/8

सासरच्यांबरोबर मॅक्सेवलची होळी

रंगांची भूरळ केवळ भारतीय क्रिकेटपटूंनाच नाही तर परदेशी क्रिकेटपटूंनाही आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लॅक्स मॅक्सवेलची पत्‍नी भारतीय आहे. त्‍यामुळे हे कपल होळी खेळण्याची एकही संधी सोडत नाहीत.

7/8

ब्रेट ली रंगला रंगात

परदेशी खेळाडूंच्या यादीत आणखी एक ऑस्ट्रेलियन माजी दिग्गज खेळाडू ब्रेट लीचं नावही आहे.  आधी क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने आणि आात आयपीएल किंवा क्रिकेट कॉमेंट्रेटीच्या निमित्ताने तो बराच वेळ भारतात असतो. अनेकवेळा होळी खेळताना पाहण्यात आले आहे

8/8

महिला खेळाडूंची रंगपंचमी

भारतीय पुरुष क्रिकेटपटूं रंगपंचमी साजरी करत असताना भारतीय महिला क्रिकेटपटूही मागे कशा राहतील. होळी खेळण्याची एकही संधी त्या खेळत नाहीत.