Holi 2023 : 5 वर्षे पळ काढला पण शेवटी सापडलोच... जावयाची गाढवावर बसवून मिरवणूक

Holi 2023 : यंदा अविनाश करपे यांना गाढवावर बसण्याचा मान..!होळी धुलीवंदनाची विड्यात जावयाला गाढवावर बसवून वरात काढण्याची अनोखी परंपरा...

Mar 07, 2023, 15:11 PM IST

जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात आहे. होळी धुलीवंदनाच्या निमित्त जावई शोधून आणतात. यंदा हा मान केज तालुक्यातील जवळबन येथील जावयाला मिळाला आहे. 

1/6

beed donkey

बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात जावयाची गावढावरुन मिरवणूक काढण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून सुरु आहे.

2/6

beed holi

गावातील या कार्यक्रमाचे आयोजन करणारी मंडळी धुलीवंदनाच्या निमित्त जावयाला शोधून आणतात आणि त्याची गाढवावरुन मिरवणूक काढतात.   

3/6

 son in law riding on a donkey

यंदाचा मान हा केज तालुक्यातील जवळबन येथील अविनाश करपे यांना मिळाला आहे. करपे यांना तरुणांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली.

4/6

son in law donkey riding

इच्छा नसतानाही मला या कार्यक्रमाच्या समितीच्या सदस्यांनी रात्री 12.30 वाजता पकडले. जबरदस्तीने मला गाडीत बसवले आणि इथे आणले. पळायचा खूप प्रयत्न केला पण पकडला गेलो, असे जावयाने म्हटले.

5/6

son in law avinash karpe

पाच वर्षांपासून माझ्या शोधात होते पण शेवटी पकडलो गेलो, असे अविनाश करपे या जावयाने म्हटले आहे

6/6

beed donkey riding tradition

80 वर्षांपासून ही परंपरा सुरु असून गावातील 12 पगड जाती यामध्ये सहभागी होतात. गाढवावर बसणाऱ्या जावयाला कपडे, बूट, सोन्याची अंगठी देण्यात येते असे गावकऱ्याने सांगितले.