White Widow: पांढऱ्या चेहऱ्या मागे काळे कृत्य ! 29 जणांची हत्या, डेंजर 'गुन्हेगार' महिला

White Widow : चेहऱ्यावर निरागसता आणि ओठांवर हास्य, हे पाहून कोणाला वाटणार नाही, या महिला गुन्हेगारी जगतातील आहेत. मात्र, त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यामागे गुन्हेगारी कृत्य दडल्याचे समोर आले आहे. गोऱ्या निरागस वाटणाऱ्या महिलांचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावलेत. 29 जणांची हत्या या महिलेने केली आहे. ही गुन्हेगारी जगतातील महिला सौंदर्यवान दिसत असली तरी तिची गुन्हेगारी पाहून धक्काच बसेल. ही महिला White Widow म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे खरे नाव समांथा ल्यूथवेट (Samantha Lewthwaite) असे आहे. समांथा ब्रिटनच्या महाविद्यालयात शिकली आणि नंतर तिने तेथील 26 नागरिकांची हत्या केली.

Apr 06, 2023, 15:14 PM IST
1/5

समांथा ल्यूथवेट (Samantha Lewthwaite) हिचा जन्म नॉर्दर्न आयर्लंडमध्ये झाला. आणि तिचे पालनपोषण इंग्लंडमध्ये झाले होते. ती थोडी समजूतदार असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. 2005 मध्ये इराकमध्ये युद्ध सुरु होते आणि ब्रिटनमध्येही निदर्शने सुरु होती.  इथून समंथाच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट आला.

2/5

इराकमध्ये सुरु असलेल्या युद्धाविरोधातील निदर्शनांमध्ये समंथा सहभागी होऊ लागली. यादरम्यान तिची भेट जर्मेन लिंडसे या कृष्णवर्णीय मुलाशी झाली. इराकमधील या हल्ल्यांनाही तो विरोध करत होता. जर्मेनने इस्लामचा स्वीकार केला होता. समंथा त्याला आवडली. मग हळूहळू समंथानेही त्याचा धर्म स्वीकारला.

3/5

विशेष म्हणजे निदर्शनांमध्ये सहभागी होत असताना समंथाला ब्रिटन आणि अमेरिकेबद्दल राग येऊ लागला. त्यानंतर तिने सोमालियातील अल शबाब या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी लंडनमध्ये ट्रेनमध्ये फिदाईन हल्ला झाला होता. यात समंथा हिच्या पतीचाही मृत्यू झाला. त्यानंतर जे उघड ते धक्कादायक होते.

4/5

लंडनच्या ट्रेनवर झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. नंतर तपासात समोर आले की बुरखा घातलेली एक महिला याचे नेतृत्व करत होती आणि ती समंथा होती. पण समंथा अतिशय हुशारीने पोलिसांना चकमा देत देश सोडून केनियाला गेली.

5/5

2012 मध्ये समंथावर केनियातील मोम्बासा येथेही हल्ला झाला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी अनेक जण जखमी झाले. यानंतर समंथासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. पण ती कधीच पकडली गेली नाही. नंतर समंथा हिचे अनेक दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध समोर आले. समंथा व्हाईट विडो म्हणून प्रसिद्ध झाली आणि नंतर तिच्यावर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली.