1/6
अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या म्हणजेच 'दबंग ३'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सलमानचा एकंदर अंदाज आणि या चित्रपटाची लोकप्रिता पाहता आतापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून सलमान साकारत असलेल्या 'चुलबूल पांडे' या पात्राच्या भूतकाळात आणि वर्तमानात डोकावता येणार आहे. ज्यामध्ये अर्थातच त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा असणार आहेच. पण, एक मराठमोळा चेहरासुद्धा भाईजान सलमानसोबत दिसणार आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
2/6
पहिल्याच चित्रपटातून थेट सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्याची, त्यातही त्याच्या मनावर राज्य करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मिळणारा हा चेहरा आहे सई मांजरेकर हिचा. सई ही अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. मुख्य म्हणजे सुरुवातीला मांजरेकरांची मोठी मुलगी अश्वमी या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा होती. पण, तसं नसल्याचं सांगत सईला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं होतं असं खुद्द मांजरेकरांनीच स्पष्ट केलं होतं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
3/6
4/6
'मिड डे'शी संवाद साधताना मांजरेकरांनी सईच्या पदार्पणाच्याच चित्रपटाविषय़ीसुद्धा वक्तव्य केलं. 'सई आणि सलमानसोबत माझं एक दृश्य चित्रपटात आहे. मुलीसोबत एकाच फ्रेममध्ये येणं, एका दृश्यावर काम करणं ही खरंच खुप सुरेख बाब आहे. माझ्यासाठी तो क्षण अभिमानाचा आणि तितकाच भावनिकही होता', असं ते म्हणाले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
5/6
असं कळत आहे की, सई या चित्रपटातून ज्या मुलीची भूमिका साकारत आहे तिला सलमान म्हणजेच 'चुलबूल पांडे' वाचवतो. पहिल्या दोन्ही चित्रपटांप्रमाणे 'दबंग'च्या या भागातही त्याची अपेक्षित अशी दमदार एंट्री असणार आहे. पण, त्यातही वेगळेपण असणार आहे. सईची भूमिका ही कथानकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
6/6