नवरात्रीत कोट्यवधी कमावतात फाल्गुनी पाठक; एका दिवसाची फी ऐकून थक्क व्हाल

| Oct 22, 2023, 13:58 PM IST

Dandiya Queen Falguni Pathak: दांडिया क्वीन म्हणून लोकप्रिय असलेल्या फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या गाण्याची नवरात्रीत अधिक मागणी असते. फाल्गुनी पाठक यांच्या गाण्यांशिवाय गरबा अपूर्ण आहे. पण तुम्हाला माहित्येय का फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या या दिवसांत किती कमवतात. 

1/7

नवरात्रीत कोट्यवधी कमावतात फाल्गुनी पाठक; एका दिवसाची फी ऐकून थक्क व्हाल

Dandiya Queen Falguni Pathak charged 20 lakh rupees for navratri 1 night

नवरात्रीत नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. त्याचबरोबर दांडिया नाइट म्हणजेच गरबा देखील खेळला जातो. देवीच्या समोर गरबा खेळण्याची प्रथा आहे. हल्ली गरब्याला इव्हेंडचे स्वरुप आले आहे. मुंबई, गुजरातसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात गरब्याचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला गायिका फाल्गुनी पाठक हजेरी लावणार असतील तर कार्यक्रमाला अधिक बहर येतो.   

2/7

दांडिया क्वीन

Dandiya Queen Falguni Pathak charged 20 lakh rupees for navratri 1 night

फाल्गुनी पाठक यांचे वय 54 वर्ष आहे. त्यांनी 1988मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात केली. चुडी जो खनकी, मैने पायल हे छनकाई आणि मेरी चुनर उड उड जाए, सारख्या गाण्यांमुळं त्या लोकप्रिय झाल्या.   

3/7

बक्कळ कमाई

Dandiya Queen Falguni Pathak charged 20 lakh rupees for navratri 1 night

 फाल्गुनी पाठक यांची गाणी नवरात्रोत्सवात अधिक गाजतात आणि त्याचमुळे त्यांना दांडिया क्वीन असंही म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत फाल्गुनी पाठक या बक्कळ कमाई करतात. 

4/7

फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमांचे आयोजन

Dandiya Queen Falguni Pathak charged 20 lakh rupees for navratri 1 night

देशातील वेगवेगळ्या भागात नवरात्रोत्सवात फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी फाल्गुनी पाठक मोठी रक्कम आकारतात. फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, फाल्गुनी पाठक एका नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी जवळपास 20 लाख रुपये घेतात. 

5/7

नऊ दिवसांत कोटींची कमाई

Dandiya Queen Falguni Pathak charged 20 lakh rupees for navratri 1 night

मीडिया रिपोर्टनुसार, फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या नऊ दिवसांत जवळपास 1.4 कोटींची कमाई करतात. 

6/7

बॉलिवूड

Dandiya Queen Falguni Pathak charged 20 lakh rupees for navratri 1 night

फाल्गुनी पाठक यांच्या एका मुलाखतीनुसार, बॉलिवूडने कधीच मला गांभीर्याने घेतले नाही. मला ऑफर तर मिळाल्या पण जेव्हा तुम्ही सिनेजगतात येतात तेव्हा अधिक जास्त मेहनत करावी लागते, असं त्या म्हणाल्या आहेत. 

7/7

शो आणि अल्बम करणार

Dandiya Queen Falguni Pathak charged 20 lakh rupees for navratri 1 night

तर, मी शो आणि अल्बम करते आणि त्यातच मला आनंद मिळतो, असंही फाल्गुनी पाठक यांनी म्हटलं आहे.