गरबा खेळताना तिघांचा Heart Attack ने मृत्यू! गरब्यात नाचताना चुकूनही करुन नका 'या' 9 गोष्टी

3 People Died in Garba : गरबा खेळताना गुजरातमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. (Gujrat 11 People Died at Gujrat) त्यापैकी 3 जणांचा मृत्यब  हा हार्ट अटॅकने झाला आहे. 

| Oct 22, 2023, 10:05 AM IST

गेल्या सहा दिवसांपासून अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्रीत गरबा खेळून हा उत्सव साजरा केला जातो. पण गरब्याच्या या उत्सावाला गालबोट लागलं आहे. गुजरातमध्ये 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 3 जणांचा मृत्यूचा हा गरबा खेळताना हार्ट अटॅकने झाला आहे. यामुळे एका तरुणाचाही समावेश आहे. गरबा खेळताना त्याच्या नाकातून रक्त येऊ लागलं आणि त्याला हृदय विकाराचा झटका आला. नवरात्रीचा उत्साह अजून आहे. असं असताना स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. उत्साहाच्या भरात आपण अनेक गोष्टींकडे कानाडोळा करतो. हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणे सुरुवातीला पाहायला मिळतात. ती कोणती जाणून घेऊया?

(फोटो सौजन्य - iStock)

1/9

थोडा ब्रेक घ्या

अनेकदा आपण उत्साहाच्या भरात खेळताना शारीरिक बदलांकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी गरबा सतत न खेळता थोडा ब्रेक घेणे अत्यंत गरजेचे आहे. रोजच्यापेक्षा अधिक घाम आल्यास थोडी विश्रांती घेणे गरजेचे आहे.   

2/9

जड आणि घट्ट कपडे टाळा

गरबा हा रंगाचा सण आहे. या दिवसांमध्ये रंगीबेरंगी कपडे घालून गरबा खेळला जातो. अशावेळी जड आणि घट्ट कपडे घालणे टाळा. कारण अनेकदा घाम आल्यावर हे कपडे अधिक घट्ट होतात. आणि गुदमरायला होऊ शकते. 

3/9

पाणी जवळ ठेवा

गरबा खेळताना अडचण नको म्हणून अनेकजण पाणी घेणं टाळतात. पण हेच घातक ठरू शकते. सतत गरबा खेळून थकवा येत असेल तर थोडं थांबा आणि पाणी प्या. उत्साहात आणि धावपळीत स्वतःला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. 

4/9

हार्ट अटॅकची लक्षणे

हार्ट अटॅकची लक्षणे  छातीत दुखण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हार्ट अटॅकची लक्षणे माहित असणे गरजेचे असते. डाव्या बाजूला छातीत दुखायला लागल्यावर दुर्लक्ष करू नका. हे सामान्य लक्षण नाही. छातीत जळजळ किंवा त्रास होत असेल तर सावधपणे काळजी घ्या.

5/9

गरब्यासोबत या गोष्टी महत्त्वाच्या

गरबा खेळताना आपण अनेकदा उत्साहात असतो. पण नंतर शरीर दुखू लागल्यामुळे आपण आराम करतो. पण तसे न करता शारीरिक हालचाल अत्यंत गरजेची असते. दिवसभरात हालचाल करा ज्यामुळे अचानक ताण पडणार नाही.

6/9

तरुण आहे मला काय होतंय

मी तरुण आहे मला काय होतंय? असा समज करुन घेऊ नका. हृदयविकाराचा त्रास कुणालाही आणि कसाही होऊ शकतो. त्यामुळे उत्साहात शरीराकडे दुर्लक्ष करू नका. 

7/9

गरब्याच्या आयोजनाची माहिती

आपण जेथे गरबा खेळतो तो परिसर आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. तसेच आयोजकांनी प्राथोमपाचर जागा कुठे केली आहे, त्याची माहिती जाणून घ्या. तसेच सोई-सुविधा नसतील तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. 

8/9

त्रास असल्यास

तुम्हाला श्वसनाचा किंवा बीपीचा त्रास होत असेल तर स्वतःची नीट काळजी घ्या. कारण गरब्यात प्रचंड प्रमाणात गर्दी असते अशावेळी श्वसानाचा किंवा बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे गरबा मोकळ्या जागी खेळायला प्राधान्य द्या. 

9/9

मोकळ्या जागी खेळा

अनेकदा गरब्याचे आयोजन बिल्डिंगच्या पार्किंग एरियात किंवा थोडं अडगळीच्या ठिकाणीही केलं जातं अशावेळी काही विशिष्ट पद्धतीची काळजी घेणे गरजेचे असते. जसे की, पंख्यांची व्यवस्था करणे यासारख्या पण तसे शक्य नसेल तर मोकळ्या जागीच गरबा खेळा.