10 कोटी Debit-Credit कार्ड ग्राहकांचा डाटा लीक, धोक्यात लोकांची बॅंक अकाऊंट्स

Credit Card डेटा लीकः डेबिट, क्रेडिट कार्ड वापरणार्‍या धोका आहे.

| Jan 05, 2021, 13:50 PM IST

Credit Card डेटा लीकः डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरणार्‍या कोट्यवधी लोकांना धोका निर्माण झाला आहे. 10 कोटी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांचा डेटा लीक झाल्याची बातमी आहे. ज्यांचा डेटा चोरीला गेला आहे अशा लोकांची बँक खाती अडचणीत येऊ शकतात.

1/4

रिपोर्ट्सनुसार कार्डधारकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर (Dark Web) विकली जात असल्याचे सांगितले जात आहे. ज्या लोकांची माहिती लीक झाली आहे, त्यांच्यासाठी ही धोक्याची बाब आहे, कारण खातेदारांचे नाव, त्यांचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी यासारख्या संवेदनशील माहिती लीक झाल्या आहेत. तसेच, क्रेडिट आणि डेबिट कार्डचे पहिले चार अंक आणि शेवटचे चार अंक, कार्डची समाप्ती तारीख देखील लीक झाली आहे, जी डार्क वेबवर विकली जात आहे.

2/4

अहवालानुसार, कार्ड वापरणाऱ्यांचा डेटा Juspay नावाच्या पेमेंट गेटवेवरून लीक झाला आहे. Juspay अ‍ॅमेझॉन ऑनलाइन फूड बुकिंग प्लॅटफॉर्म स्विगी (Swiggy) आणि मेकमायट्रिपच्या (Makemytrip) बुकिंग पेमेंटवर प्रोसेस करत आहे.

3/4

अहवालात असे सांगितले गेले आहे की, यात सर्व 10 कोटी लोकांचा डेटा आजच्या 5 महिन्यांपूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये लीक झाला होता. डार्क वेबमध्ये गेलेल्या डेटामध्ये मार्च 2017 ते ऑगस्ट 2020 पर्यंत वापरकर्त्यांची माहिती असल्याचेही समोर आले आहे.

4/4

यापूर्वी डिसेंबरमध्ये 70 लाख भारतीयांचे डेबिट कार्ड डेटा लीक झाल्याची बातमी आली होती. स्वतंत्र भारतीय सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजारिया सांगतात की, हा डेटा डार्क (Dark Web) वेब फोरमवर ठेवला गेला होता जिथून तो ग्राहकांना दिला गेला.