GANESH UTSAV 2023 : तुमच्या घरातील बाप्पा झी 24 तासवर; पाहा घरगुती गणपतींची विलोभनीय आरास आणि लाडके गणराय

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 20, 2023, 19:57 PM IST

GANESH UTSAV 2023 | Day-2 : जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

1/10

नागेश कांबळे

 Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

नागेश कांबळे यांच्या घरातील सुंदर,लोभसवाणं रुपाच्या बाप्पाने सर्वाचं लक्ष वेधले आहे.या गणपतीला पेशवाई फेट्यात गणपती खुप सुंदर दिसतोय.

2/10

विकास बंधू कडू

Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

कर्जत येथील विकास बंधू कडू यांनी या वर्षी पर्यावरणपूरक बाप्पा साकारला आहे.पुठ्ठे, पानाची पत्रावळी,डिश,चमचे इत्यादि पासून तयार केलेला देखावा केला आहे.

3/10

माऊली गणेश मंडळ लातुर

Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

माऊली गणेश मंडळ  लातुर या मंडळाने गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला. लाडक्या बाप्पांची मूर्ती अगदी सुंदर आहे.  फुलांच्या सजावटीने केले बालगणेशाचे स्वागत करण्यात आले.

4/10

निर्भय राठोड

Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

निर्भय राठोड यांनी आकर्षक फुलांची सजावट करत बाप्पाची मनोभावे स्थापना केली आहे. पारंपरिक वेशभुषेत बाप्पाला त्यांनी सजवलं आहे. 

5/10

तानाजी मारुती देशमुख, भांडुप (प.), मुंबई

 Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

गणराया संगे रंगला रिंगण सोहळा.....तुकोबा संगे विठ्ठल विठ्ठल बोला. या ओळीचे स्मरण तानाजी मारुती देशमुख यांचा गणपती पाहिल्यावर होते. 

6/10

अभिषेक इत्ते

Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

बालगणेशाचं मनमोहक रुप अगदी मन भारावुन टाकणारं आहे.केसात मोरपंख  लावलेला लाडका गणराया खुप सुंदर दिसत आहे.चंद्रयान तीन हे मिशन यशस्वीरित्या पार पडले ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळेच यावर्षीचे गणपती बाप्पाचं डेकोरेशन अभिषेक इत्तेंनी चंद्रयान-३ या संकल्पनेवर साकारला आहे.

7/10

अमोल शंकरराव डांगे, कोल्हापूर

Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

अमोल यांच्या घरी गणपती सजावटीचा देखावा गर्जा महाराष्ट्र माझा - थम वापरुन केला आहे.महाराष्ट्रातील ७ आश्चर्ये पुर्णत: काळ्या मातीची गणेशमूर्ती असं यांच्या सजावटीटचं वैशिष्ट आहे.

8/10

शैलेश राजेंद्र चौधरी

Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

संपुर्णपणे टाकाऊ वस्तू पासुन बनवले हे टीकाऊ 1.एका लहान टोपली,एका मोठी टोपली, एका पत्र्याचा डबा , काही सराईचे तुकडे ह्य सार्व वस्तूंच्या वापर करुन सादरीकरण साकारले आहे.हे सर्व सादरीकरण हे 10-12वर्षच्या मुलंनी साकारले आहे.

9/10

मन रेळे

Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

या वर्षी मन रेळे यांची सजावट संकल्पना महाआरती थीमवर आधारित आहे .ही सजावट पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. तपशीलांसह ही सजावट पूर्ण करण्यासाठी दोन महिने लागले.

10/10

भास्कर शेरकर, मुंबई ( मुलुंड )

 Day-2 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

भास्कर शेरकरांनी या वर्षी चांद्रयान चा देखावा साकारला आहे.भारताचे मिशन चांद्रयान यशस्वी झाले त्यावर भास्कर शेरकर यांनी चंद्राची प्रतिकृती आणि रॉकेट मॉडल बनवले आहे. हे बनवताना प्लास्टिक आणि थर्माकोल चा वापर केलेला नाही.