GANESH UTSAV 2023 : तुमच्या घरातील बाप्पा झी 24 तासवर; पाहा घरगुती गणपतींची विलोभनीय आरास आणि लाडके गणराय

संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे.णपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. 

Sep 20, 2023, 17:59 PM IST

Ganesh Chaturthi 2023: संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे.णपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. 

1/10

राहुल पवार

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीला अनुसुरून त्यांना हि कल्पना सुचली असं राहुल म्हणतात. यातून माननीय श्री शरद पवार साहेब मार्ग काढतील अश्या प्रकारची कल्पना आहे,असं त्याचं मत आहे.

2/10

सौरभ दिपक जाधव

 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

सौरभ जाधव यांनी अतिशय सुंदर, टाकाऊ वस्तूंपासून बाप्पाचा मखर सजवला आहे.नारळाच्या करवंटीच्या साहाय्याने त्यांनी उत्तम सजावट केली आहे.  

3/10

यश गवळी, सिडनी (ऑस्ट्रेलिया )

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

श्री क्षेत्र पंढरपूराचा देखावा करत यश गवळी यांनी परदेशात ऑस्ट्रेलियामध्ये बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

4/10

गणेश दशरथ भोने ( हिंगोली )

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

गणेश दशरथ भोने यांनी अत्यंत फुलांचे डेकोरेशन करून सुंदर देखावा करत लाडक्या गणरायाची स्थापना केलीयं.

5/10

प्रसाद लाड

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

प्रसाद यांनी वारकरी संप्रदायाचा देखावा केलाय. तुकाराम महाराजांची बिरुदावलीने भाविकाचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.  

6/10

दिलीप साळवी,बोरीवली ( मुंबई )

 Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

मुंबईच्या साळवी कुटुंबाने यंदा चांद्रयान-3 चा अनोखा देखावा केला आहे. यामध्ये बाप्पाची मूर्ती ही खुप सुंदर दिसत आहे. 

7/10

शुभम धानोकार, (अकोला )

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

शुभम धानोकार यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले.सुंदर सजावट करत त्यांनी बाप्पाचे स्वागत केले आहे.

8/10

ज्योती किशोर चव्हाण

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

ज्योती किशोर चव्हाण  यांच्या बाप्पाला यंदा 11वर्ष झाली. या गणपतीचे पूर्ण डेकोरेशन हे इको फ्रेंडली आहे.

9/10

अमोघ सागवेकर

Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

अमोल सागवेकर यांनी आपल्या गणपती डेकोरेशनमधून संदेश दिलाय,आपल्या पर्यावरणाचे रक्षण करा, मातीचे प्रदूषण थांबवा आणि आपल्या मातीचे संरक्षण करण्यासाठी पावले उचला.

10/10

मोहन हबीब, ( पुणे )

  Ganesh Utsav Celebration And Unique decoration In households

सध्या महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या 'चाळ' संस्कृतीवर  मोहन हबीब यांनी प्रकाश टाकला आहे.आणि चाळींचा अद्भुत देखवा साकारला आहे.