शाहरुख खानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीवर आली हेअर सलून चालवण्याची वेळ!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चक दे इंडिया' या चित्रपटात अनेक अभिनेत्री दिसल्या. यातील अनेक मुलींनी अभिनय क्षेत्रात स्वत: चं स्थान निर्माण केलं. पण त्यातली एक मुलगी अशी आहे जिनं अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यानंतर अभिनय क्षेत्र सोडलं आणि सलून सुरु केलं. 

| Jul 23, 2024, 16:22 PM IST
1/7

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' आली होती. शाहरुख खानच्या हटके स्टाईलमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटात अनेक अभिनेत्री होत्या. त्या सगळ्या अभिनेत्रींपैकी एक अशी होती, जिचं करिअर फक्त 10 चित्रपटांपर्यंत राहिलं आहे. 

2/7

करिअरमध्ये केलेल्या या 10 चित्रपटांपैकी एका चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड पुरस्कार मिळाला होता. पण तरी सुद्धा त्या अभिनेत्रीनं बॉलिवूड सोडलं. 

3/7

ही अभिनेत्री कोणी दुसरी नाही तर अनायता नायर आहे. 2005 मध्ये एक मल्याळम चित्रपटात एक स्पेशल अपीयरंस दिल्यानंतर अनायतनं शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

4/7

या चित्रपटात अनायतनं आलिया बॉसची भूमिका साकारली होती. ही महिला हॉकी टीमची सीनियर खिलाडी आहे. 'चक दे इंडिया' या चित्रपटातून शाहरुख खानसोबत एक चांगली सुरुवात केल्यानंतर अनायतनं काही चित्रपटांमध्ये काम केलं. अनायत त्यानंतर 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेलडन अब्बा' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड देण्यात आला होता. त्याशिवाय अनायत 'आशाएं', 'झूठा ही सही', 'दम मारो दम', 'एकांत' आणि 'फोर्स' या चित्रपटात दिसली होती. 

5/7

दरम्यान, 'फोर्स'  हा अनायता नायरचा अखेरचा चित्रपट ठरला. जेव्हा फोर्स प्रदर्शित झाला त्यावेळी अनायताचं वय 27 वर्ष होतं. 27 वर्षांची असताना अनायतानं चित्रपटसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. 

6/7

2011 मध्ये अखेर अनायतानं लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीपासून लांब राहत एक हेयरस्टायलिस्ट म्हणून करिअर करण्याचं ठरवलं आणि हॉंगकॉंगमध्ये आता ती एक सलून चालवते. 

7/7

एका रिपोर्टनुसार, अनायता ही हॉंगकॉंगची सर्वश्रेष्ठ हेयर स्टायलिस्ट होती. तिच्या सलूनचं नाव हेअर बाय अनायता असं नाव आहे. हे तिथल्या लोकप्रिय सलून्सपैकी एक आहे. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अनायतानं जवळपास एक दशकाआधी बिझनेस सेट करण्यात स्ट्रगल केलं.