रेल्वेचा शाही थाट! डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 पुन्हा धावण्यासाठी सज्ज; मुंबईच्या CSMT स्टेशनवरुन होणार शुभारंभ

डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही देशातील सर्वात महागडी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये शाही सुविधा मिळतात. 

Devendra Kolhatkar | Sep 20, 2023, 23:37 PM IST

Deccan Odyssey Train:  देशातल्या शाही रेल्वेंपैकी एक असलेली डेक्कन ओडिसी आता पुन्हा ट्रॅकवर धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथून शुभारंभ होणार आहे. 

1/7

सन 2004 ते 2020 पर्यंत या अलिशान आणि आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यानंतर ही ट्रेन पुन्हा एकदा पर्यटांच्या सेवेत दाखल होणार आहे.   

2/7

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

3/7

 या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.

4/7

. या ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात.

5/7

डेक्कन ओडिसी 2.0 ही ट्रेन आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. 

6/7

  डेक्कन ओडिसी 2.0 देशातील प्रसिध्द 4 शाही रेल्वेपैंकी एक आहे. 

7/7

डेक्कन ओडिसी 2.0 या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक 18 येथे गुरूवार 21 सप्टेंबर रोजी होार आहे.