धनत्रयोदशी 2018 : या दिवशी घरात आणा या गोष्टी

| Oct 31, 2018, 20:12 PM IST
1/6

शंख

शंख

या धनत्रयोदशीला तुम्हाला काही चांगल खरेदी करायचं असेल तर शंख खरेदी करा. शंख तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. शंखामुळे फक्त आर्थिक नाही तर स्वास्थ देखील चांगल राहतं. घरात रोज सकाळी शंख वाजवल्यामुळे नकारात्मक गोष्टी दूर जातात. 

2/6

तांब्याचा कलश

तांब्याचा कलश

शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धनवंतरी समुद्र मंथन दरम्यान अमृत कलशसोबत प्रकट झाले होतं. त्यामुळे या दिवशी तुम्ही कलश देखील घरी आणू शकता. ही गोष्ट अतिशय लाभदायी असतं. त्यामुळे घरात तांब्याचा कलश आणावा आणि त्यामध्ये रोज रात्री पाणी भरून ठेवावं व सकाळी ते प्यावं. 

3/6

झाडू

झाडू

धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. या झाडूमुळे नकारात्मक गोष्टी दूर राहतात. घरातील दरिद्रता देखील बाहेर जाते. याकरता धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. 

4/6

कवड्या

कवड्या

असं म्हटलं जातं की, लक्ष्मीला कवड्या अतिशय लोकप्रिय हो्त्या. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीच्या चरणाशी कवड्या ठेवा. असं केल्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहिल. 

5/6

लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती

लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती

या दिवशी घरी भगवान गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती आणा. यामुळे तुमच्यपासून नकारात्मक शक्ती दूर राहिल. आणि जीवनात सकारात्मक गोष्टी घडतील. 

6/6

धण्याचे दाणे

धण्याचे दाणे

धनत्रयोदशीच्या दिवशी धण्याचे बी पेरा. असं म्हटलं जातं की, धण्याचे बी पेरल्यामुळे परिवारात सुख - समृद्धी नांदते. धण्याचे बी हे उन्नतीचे प्रतिक असते. तसेच धणे शरीरासाठी देखील लाभदायक असता.