हिरा खरा आहे की खोटा कसं ओळखाल? या सोप्या टिप्स लक्षात ठेवा

सोन्या-चांदीइतकेच हिऱ्यालादेखील महत्त्व आहे. कधीकधी सोन्यापेक्षा हिऱ्यांचे दागिने महाग असतात. पण आजकाल खोट्या हिऱ्यांची विक्रीदेखील वाढली आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळं तुम्ही खऱ्या हिऱ्यांची पारख करु शकणार आहात. 

| Jan 03, 2024, 18:08 PM IST

Diamond Purity Test : सोन्या-चांदीइतकेच हिऱ्यालादेखील महत्त्व आहे. कधीकधी सोन्यापेक्षा हिऱ्यांचे दागिने महाग असतात. पण आजकाल खोट्या हिऱ्यांची विक्रीदेखील वाढली आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळं तुम्ही खऱ्या हिऱ्यांची पारख करु शकणार आहात. 

1/7

diamond purity test know how to check real diamond at home

diamond purity test know how to check real diamond at home

महिलांना हिऱ्यांची दागिने घालायला खूप आवडतात. त्यामुळं अनेकदा मुलं त्यांच्या प्रेयसीला हिऱ्यांची अंगठी देऊन प्रपोज करतात. मात्र हिरे खरेदी करताना तो हिरा खरा आहे की खोटा तसंच, त्याची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. 

2/7

टिप्स

diamond purity test know how to check real diamond at home

हिऱ्यांमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. अनेकदा खऱ्या हिऱ्यांच्या नावाखाली सफेद जिक्रोन, क्वार्टज, काच, सफेद पुखराज इतकंच नव्हे तर सफेद स्पिनेलदेखील विकले जातात. आज आम्ही तुम्हाला खऱ्या हिऱ्याची पारख कशी करता येईल याच्या काही टिप्स देणार आहोत. 

3/7

पाणी

diamond purity test know how to check real diamond at home

हिरा खरा आहे की खोटा याची सत्यता तपासण्यासाठी एका ग्लासात पाणी घ्या आणि त्यात हिरे टाका. पाण्याने भरलेल्या ग्लासात हिरा टाकल्यास तो बुडला तर तो शुद्ध आहे हे समजून जा.   

4/7

इंद्रधन्युष्याचे रंगाचे प्रतिबिंब

diamond purity test know how to check real diamond at home

हिऱ्याच्या आत धूसर आणि पांढरी चमक दिसणे, तसंच, चारही बाजूने इंद्रधनुष्याच्या रंगाची चमक दिसणे हे खूप सामान्य आहे. पण जर हिरा नकली आहे तर हिऱ्याच्या आतून इंद्रधन्युष्याचे रंगाचे प्रतिबिंब अधिक तीव्र स्वरुपाचे असते.

5/7

हिऱ्याची पारख

diamond purity test know how to check real diamond at home

हिऱ्याची पारख करण्याची आणखी एक टिप्स म्हणजे, सर्व लाइट बंद करा आणि हिरा अंधारात ठेवा. जर हिरा खरा असला तर त्याच्या आत हलका निळा रंग दिसेल. खोट्या हिऱ्यात पिवळा, हिरवा या रंगाची झलक दिसते.   

6/7

थर्मल कंडक्टिव्हिटी

diamond purity test know how to check real diamond at home

हिऱ्याची पारख करण्यासाठी हिरा गरम वाफेवर धरावा. काच गरम वाफेवर धरली असता लगेच धूसर होते. हिऱ्यामध्ये ‘थर्मल कंडक्टिव्हिटी’ असल्याने हिरा गरम वाफेवर धरल्याने देखील धूसर होत नाही

7/7

हिऱ्यावरील वाफ

diamond purity test know how to check real diamond at home

दोन बोटांच्या मध्ये एक हिरा घ्या आणि त्यावर थोडी फुंकर मारा. हिऱ्याच्या पृष्ठभागावरील धुके लगेच नाहीसे होते. दुसरीकडे, बनावट हिरा असल्यास सेकंदांसाठी वाफ धरून ठेवतो.