हे तुम्हाला माहित आहे का? टाटा, अंबानी आणि देशातील बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात?

रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह देशातील बड्या कंपन्यांची उलाढाल ही कोट्यावधीची आहे.  या कंपन्यांकडून टॅक्सच्या रुपात भरताच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होते. 

Aug 01, 2023, 18:39 PM IST

ITR Filling:  आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपली आहे. आयकर रिटर्न भरण्याची मुदत संपल्यामुळे कर दात्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दंडाची रक्कम भरुन आयकर रिटर्न भरावा लागणार आहे. भारतातील प्रत्येक करदात्याला तसेच कंपन्यांना आयकर रिटर्न भरावा लागतो. रतन टाटा, मुकेश अंबानी या प्रसिद्ध उद्योगपतींसह बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात?  जाणून घ्या.

1/8

रतन टाटा यांच्या टाटा ग्रुप, अंबानी यांची  रिलायन्स इंडस्ट्रीज, जिंदाल ग्रुप, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तसेच ITC या भारतातील बड्या कंपन्या आहेत. या कंपन्या कोट्यावधीचा टॅक्स भरतात. 

2/8

टाटा ग्रुप

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा स्टील यांची कोट्यावधींची उलाढाल आहे. Cleartax अहवालानुसार, TCS ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 11,536 कोटी रुपयांचा कर भरला होता. हा कर कंपनीच्या एकूण महसुलाच्या 6.8 टक्के इतका आहे. टाटा स्टील आपल्या उलाढालीच्या 8.4 टक्के कर सरकारला देते. हा कराचा आकडा 11,079 कोटी रुपये इतका आहे.

3/8

रिलायन्स इंडस्ट्रीज

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे मालक आहेत. मुकेश अंबानी यांची रिलायन्स ही सर्वात जास्त टॅक्स भरणारी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारत सरकारला 7,702 कोटी रुपये कर भरला. हा कर कंपनीच्या एकूण महसुलाच्या 1.65 टक्के आहे.

4/8

LIC

LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.  LIC कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये सुमारे 7,902 कोटी रुपयांचा कर भरला होता, जो एकूण महसुलाच्या 2.9 टक्के इतका आहे.

5/8

जिंदाल ग्रुप

JSW स्टील ही जिंदाल ग्रुपची कंपनी आहे. जिंदाल ग्रुपने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारत सरकारला 8,013 कोटी रुपयांचा टॅक्स दिला. ही टॅक्सचा रक्कम कंपनीच्या एकूण महसुलाच्या 6.6 टक्के इतकी आहे. 

6/8

ITC

ITC लिमिटेड ही भारतातील सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1910 मध्ये झाली. याचे हेड ऑफिस कोलकाता येथे आहे. कंपनी अन्न, सिगारेट आणि सिगार, कागद, वैयक्तिक काळजी आणि स्टेशनरी यांसारखी उत्पादने तयार करते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, ITC ने 4,771 कोटी रुपयांचा कर भरला होता, जो महसुलाच्या 7.6 टक्के आहे.

7/8

इन्फोसिस

इन्फोसिस भारतातील सर्वात मोठी आयटी कंपन्यांपैकी एक आहे. इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 7,260 कोटी रुपयांचा कर भरला, जो कंपनीच्या महसुलाच्या 6.7 टक्के इतका आहे. 

8/8

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही देशातील मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक आहे. या पेट्रोलियम कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 7,549 कोटी रुपयांचा कर भरला.