पुणे मेट्रोचा रूट नेमका कसा, कुठे थांबणार अन् तिकीट किती? येथे वाचा सर्व

  ऑगस्टपासून पुणेकर गारेगार प्रवास अनुभवणार आहेत. महामेट्रोने मेट्रोच्या तिकिटांबाबत मोठी घोषणा केली आहे. तसंच, पुणे मेट्रोला कुठे थांबा असेल याची सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर 

| Aug 01, 2023, 18:31 PM IST

Pune Metro Update:  ऑगस्टपासून पुणेकर गारेगार प्रवास अनुभवणार आहेत. महामेट्रोने मेट्रोच्या तिकिटांबाबत मोठी घोषणा केली आहे. तसंच, पुणे मेट्रोला कुठे थांबा असेल याची सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर 

1/8

पुणे मेट्रोचा रूट नेमका कसा, कुठे थांबणार अन् तिकीट किती? येथे वाचा सर्व

Two New Pune Metro Lines To Open For Public From Today know the route fares

पुणे मेट्रो आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण केले. मेट्रोमुळं पुणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे. आजपासून फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या मार्गावर मेट्रो सुरु होत आहे. आज उद्घाटन झालेल्या पुणे मेट्रोची स्थानके कोणती आणि तिकिट दर जाणून घेऊया. 

2/8

असे असतील तिकिट दर

Two New Pune Metro Lines To Open For Public From Today know the route fares

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या तिकिटाचे दर 10 ते 30 रुपयांपर्यंत आहेत. प्रत्येक स्थानकांपर्यंत तिकिटाचे दर वेगवेगळे आहेत. दहा मिनिटांना मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.पण कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावेल. सध्या प्रवाशांच्या सेवेत 13 मेट्रो आहेत. तर, सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मेट्रोची सेवा सुरु राहणार आहे. 

3/8

गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल

Two New Pune Metro Lines To Open For Public From Today know the route fares

गरवारे महाविद्यालयातून मेट्रोचा आरंभ असून दुसरे स्थानक डेक्कन असे आहे. 

4/8

गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल

Two New Pune Metro Lines To Open For Public From Today know the route fares

 गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानकादरम्यान छत्रपती संभाजी उद्यान हा एक थांबा असणार आहे.

5/8

गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल

Two New Pune Metro Lines To Open For Public From Today know the route fares

 गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानकादरम्यान पुणे महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालय अशी दोन स्थानके असतील

6/8

गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल

Two New Pune Metro Lines To Open For Public From Today know the route fares

गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानकादरम्यान आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल अशी स्थानके आहेत. 

7/8

फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय

Two New Pune Metro Lines To Open For Public From Today know the route fares

या मार्गादरम्यान फुगेवाडी, दापोडी, बोपोडी या स्थानकांदरम्यान मेट्रो थांबा घेणार आहे. 

8/8

फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय

Two New Pune Metro Lines To Open For Public From Today know the route fares

फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मार्गावर शिवाजीनगर ते जिल्हा न्यायालय अशी स्थानके असतील