Team India: आर आश्विनला करा टीम इंडियाचा कॅप्टन; भारताच्या 'या' खेळाडूची थेट मागणी!

  येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महिलांव्यतिरिक्त बीसीसीआय पुरुष क्रिकेट संघाला चीनमधील हांगझोऊ येथे पाठवलं जाऊ शकतं. अशातच आता या सामन्यांसाठी आर आश्विनला (Ravi Ashwin) कॅप्टन म्हणून पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.

Jul 02, 2023, 21:13 PM IST

Asian Game 2023:  येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महिलांव्यतिरिक्त बीसीसीआय पुरुष क्रिकेट संघाला चीनमधील हांगझोऊ येथे पाठवलं जाऊ शकतं. अशातच आता या सामन्यांसाठी आर आश्विनला (Ravi Ashwin) कॅप्टन म्हणून पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.

1/5

आश्विन महान खेळाडू

आश्विनच्या गोलंदाजीचा दर्जा आणि त्याने घेतलेल्या विकेट्सच्या संख्येनुसार तो आतापर्यंत खेळलेल्या महान खेळाडूंपैकी एक आहे, असं दिनेश कार्तिक याने म्हटलं आहे.

2/5

आश्विनला कर्णधार बनवायला हवं

मला खरोखर वाटतं की जर भारत बी संघ पाठवत असेल आणि मुख्य संघ विश्वचषकाची तयारी करत असेल, जर तो एकदिवसीय सेटअपचा भाग नसेल तर आश्विनला कर्णधार बनवायला हवं, अशी मागणी दिनेश कार्तिकने केली आहे.

3/5

मला वाटतं की आश्विन कर्णधारपदासाठी पात्र आहे आणि त्याने संघाचा कर्णधार होण्याचा अधिकार मिळवला आहे. किमान आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी अश्विनला कर्णधार बनवावं, असं मला वाटतं. हे त्याच्यासाठी एक यश असेल, असंही दिनेश कार्तिकने म्हटलं आहे.  

4/5

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडिया खेळणार असेल तर त्यासाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळण्याची शक्यता आहे. अशातच आता डीकेच्या मागणीमुळे आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

5/5

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा

दरम्यान, कार्तिकने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितलंय. मी तामिळनाडूच्या निवडकर्त्यांना सांगू इच्छितो की, मी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध आहे. स्पर्धेत खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे, असं कार्तिक म्हणालाय.