अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 'हे' बडे नेते ईडीच्या फेऱ्यात; मोठ्या घोटाळ्यांचे आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादी पक्षाच्या काही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षातील नेत्यांवर केलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपांमधून त्यांना मुक्त केले. याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.  

Jul 02, 2023, 19:17 PM IST

Ajit Pawar :  शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार ( Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Sharad Pawar) शपथ घेतली. तर, अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे सर्वसच्या सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला.  शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांच्या गटातील अनेक आमदार आणि नेते ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. 

1/5

रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळा प्रकरणी सुनील तटकरे यांच्यावर गुन्हा देखील झाला होता. 

2/5

छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये जावे लागले होते.  

3/5

प्रफुल्ल पटेल यांच्यावर मुंबईतील वादग्रस्त मालमत्तेच्या व्यवहारात आरोप झाले होते.  

4/5

अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. 

5/5

हसन मुश्रीफ यांच्यावर कागल मधील साखर कारखान्याचा घोटाळ्याचा आरोप झाला आहे.