दिनेश कार्तिक आणि दीपिकाच्या जुळ्या मुलांची नावे अतिशय अर्थपूर्ण, उच्चारताच मिळेल समाधान

Dinesh Kartik Twins Name : दिनेश कार्तिक आणि पत्नी दीपिका यांची सध्या चर्चा होत आहे. एशियन गेम्स 2023 मध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर खासगी जीवनावर चर्चा होत आहे. 

| Oct 11, 2023, 13:23 PM IST

Deepika Pallikal Asian Games : भारतीय क्रिकेटपट्टू दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) पत्नी दीपिका पल्लीकलने भारताच नाव उंचावल आहे. चीनमध्ये एशियन गेम्स स्पर्धेत (Asian games 2023) भारताच्या दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) आणि हरिंदर पाल सिंह (Harinderpal Singh) या जोडीनं स्क्वॉश खेळातील मिश्र दुहेरी गटात चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकलं. या विजयानंतर दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी दीपिका यांच कौतुक होत आहे. 

दिनेश कार्तिक आणि दीपिका या दोघांच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत. दीनेश-दीपिका यांची लव्हस्टोरी फिल्मी नाही तर प्रेरणादायी आहे. प्रेम एकमेकांना जगायला शिकवतं याचं दर्शन यामधून घडतं. दिनेश आणि दीपिका यांना जुळी मुलं आहेत. या दोघांनी मुलांना दिले अतिशय छान नाव. 

(फोटो सौजन्य - Dinesh Karthik Instagram / iStock)

1/7

दिनेश-कार्तिकच्या मुलांची नावे

Dinesh Karthik Wife Deepika Pallikal Got Gold Medal in Asian Games 2023 Know Their Twins Baby Names And Meaning

दिनेश आणि दीपिका यांनी त्यांच्या एका मुलाचे नाव 'झियान' ठेवले आहे. झियान नावाचा अर्थ आत्मशांती असा होतो. सेल्फ पिस असा देखील याचा अर्थ आहे. तसेच "जीवन आणि मजबूत" असा देखील याचा अर्थ होतो.  दिनेश कार्तिकच्या दुसऱ्या मुलाचं नाव आहे 'कबीर'. कबीर हे अतिशय लोकप्रिय नाव आहे. कबीर नावाचा अर्थ आहे महान.  कबीर हे भारतीय कवी आणि संताचे नाव देखील आहे.  

2/7

जुळ्या मुलांची नावे

Dinesh Karthik Wife Deepika Pallikal Got Gold Medal in Asian Games 2023 Know Their Twins Baby Names And Meaning

'आदेश' - 'संदेश'  ही दोन्ही नावे यमक जुळणारी आहे. 'आदेश' या नावाचा अर्थ आहे सूचना आणि 'संदेश' या नावाचा अर्थ आहे निरोप. ही दोन्ही नावे तुम्ही मुलांसाठी निवडू शकता.   

3/7

आदी-अनंत

Dinesh Karthik Wife Deepika Pallikal Got Gold Medal in Asian Games 2023 Know Their Twins Baby Names And Meaning

'आदी'- 'अनंत' ही दोन्ही नावे जुळ्या मुलांसाठी निवडू शकता. 'आदी' या नावाचा अर्थ सुरुवात असा आहे तर 'अनंत' या नावाचा अर्थ अगणित असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीची नावे आहेत. 

4/7

अहान-आरुष

Dinesh Karthik Wife Deepika Pallikal Got Gold Medal in Asian Games 2023 Know Their Twins Baby Names And Meaning

'अहान'-'आरुष' ही दोन्ही नावे वेगळी आहेत. सूर्योदय, शुभप्रभात असा 'अहान' नावाचा अर्थ आहे. तर हिवाळ्यात सूर्याचे पहिल किरण म्हणजे 'आरुष' असा त्याचा अर्थ आहे. दोन्ही नावे अतिशय युनिक आहेत.   

5/7

अचल-अखिल

Dinesh Karthik Wife Deepika Pallikal Got Gold Medal in Asian Games 2023 Know Their Twins Baby Names And Meaning

'अचल'-'अखिल' ही दोन्ही तीन अक्षरी वेगळी नावे आहेत. 'अचल' या नावाचा अर्थ आहे स्तब्ध तर 'अखिल' नावाचा अर्थ आहे पूर्ण विश्व. या दोन्ही नावांचा अर्थ होईल अतिशय खास. 

6/7

अनव-भाविश

Dinesh Karthik Wife Deepika Pallikal Got Gold Medal in Asian Games 2023 Know Their Twins Baby Names And Meaning

जर तुमच्या मुलाचे नाव 'अ' अक्षरावरून पडले असेल तर तुम्ही त्याला 'अनव' हे नाव देऊ शकता. 'अनव' नावाचा अर्थ मानवी आणि जीवनगुणांशी संबंधित आहे. 'भाविश' नावाचा अर्थ अस्तित्वाचा परमेश्वर आहे, जीवनाचा स्रोत असलेला सर्वोच्च प्राणी आहे.

7/7

आदिन-आदिल

Dinesh Karthik Wife Deepika Pallikal Got Gold Medal in Asian Games 2023 Know Their Twins Baby Names And Meaning

'आदिन' आणि 'आदिल' ही दोन्ही नावे अतिशय हटके आहेत. 'आ' वरून जुळ्या मुलांची नावे 'आदिन' या नावाचा अर्थ आहे सुंदर तर 'आदिल' या नावाचा अर्थ आहे प्रामाणिक, न्यायाधीश.