दात घासण्याआधी तुम्ही ब्रश ओला करता का? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

Health Tips: निरोगी आरोग्य हवं असेल तर रोज ब्रश करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळेच सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं गरजेचं असतं. जेवल्यानंतर दातात अडकलेलं अन्न आणि प्लाक काढण्यासाठी ब्रश करणं हाच पर्याय आहे.   

Jul 17, 2023, 16:34 PM IST
1/11

Health Tips: निरोगी आरोग्य हवं असेल तर रोज ब्रश करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळेच सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं गरजेचं असतं. जेवल्यानंतर दातात अडकलेलं अन्न आणि प्लाक काढण्यासाठी ब्रश करणं हाच पर्याय आहे.   

2/11

पण दात घासण्यापूर्वी अनेकजण ब्रश ओला करतात. या एका चुकीमुळे तुमचं मौखिक आरोग्य बिघण्याची शक्यता आहे.  

3/11

दात घासण्याच्या आधी ब्रशवर टूथपेस्ट लावण्याआधी तो ओला करण्याची सवय असेल तर ही चूक करु नका. यामुळे तुमचे मौखिक आरोग्य बिघडू शकते.   

4/11

पण कारण काय?

ब्रश ओला केल्यानंतर त्यावर टूथपेस्ट लावून दात घासण्यास सुरुवात केली असता लगेच फेस होतो. त्यामुळे टूथपेस्ट जास्त वेळ तोंडात राहत नाही आणि दात योग्य प्रकारे स्वच्छ होत नाहीत.   

5/11

जोर-जोरात ब्रश करणे यानेही तुमचं मौखिक आरोग्य बिघडू शकते.   

6/11

ब्रशला कॅप लावा

अनेकांना ब्रशवर धूळ असल्याने ती स्वच्छ करावी असा प्रश्न पडतो. यावर उपाय म्हणजे, दात घासल्यानंतर ब्रशला कॅप लावून ठेवा.   

7/11

ब्रश किती वेळा करावा?

सकाळी आणि रात्री असे किमान दिवसातून दोन वेळा तरी ब्रश करावा. दरम्यान, ब्रश करताना सर्व दात स्वच्छ होतील अशाप्रकारे करावा.   

8/11

किती वेळ करावा?

2 ते 3 मिनिटांहून जास्त वेळ ब्रश करु नये. तसंच जास्त जोर लावू नका.   

9/11

ब्रशची निवड कशी करावी?

ब्रशची निवड करताना ब्रिस्टल्स सॉफ्ट, नायलॉनचे व गोल टिप्सचे असावेत.   

10/11

फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट टाळावी

टूथपेस्टही शक्यतो सफेद किंवा फ्लोराईडयुक्त असेल असा प्रयत्न करा. पण घरात लहान मुले असतील तर फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट टाळा.   

11/11

जीभही स्वच्छ ठेवा

दात घासत असताना जीभही स्वच्छ ठेवा. ब्रशच्या मागील भागाचा वापर करत किंवा माऊथ क्लीनरने तुम्ही जीभ स्वच्छ करु शकता.