Actresses Quit Industry : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी सोडली अ‍ॅक्टींग इडस्ट्री, जाणून घ्या

Actresses Quit Industry : इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एकेकाळ छोटा पडदा गाजवला. हा पडदा गाजवून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. यानंतर अचानक या अभिनेत्रींनी अभिनय विश्व सोडलं.

Feb 14, 2023, 20:48 PM IST

Tv Actresses Quit Acting: इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एकेकाळ छोटा पडदा गाजवला. हा पडदा गाजवून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. यानंतर अचानक या अभिनेत्रींनी अभिनय विश्व सोडलं.या पक्तीत अनेक अभिनेत्रींची नावे आहेत.या अभिनेत्री कोण आहेत? हे जाणून घेऊयात. 

1/5

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये दिशा वकानीने (Disha Vakani) दयाबेनची भूमिका साकारली होती. ही भूमिका तिने संस्मरणीय बनवली. आजही तिचे पुनरागमन अपेक्षित आहे,पण दिशा दोन मुलांची आई झाली असून तिचे पूर्ण लक्ष कुटुंबावर आहे.

2/5

सौम्या टंडन (Saumya Tandon) गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात आहे. परंतु तिला सर्वात जास्त प्रसिद्धी अनिता भाभी बनून मिळाली. 'भाभीजी घर पर हैं' या शोने तिला खूप ओळख दिली. पण लॉकडाऊननंतर सौम्याने शोचा निरोप घेतला. ती आई बनली असून ती आपल्या मुलासोबत वेळ घालवत आहे.

3/5

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधली कीर्ती गोएंका  तुम्हाला आठवत असेलच. तिचा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडला होता.  पण लग्नानंतर मोहिनाने ( Mohena kumari)टीव्हीच्या जगतातून निरोप घेतला.तिला अभिनयाची उणीव भासत असली तरी आई झाल्यानंतर तिचे पूर्ण लक्ष आपल्या मुलावर आणि कुटुंबावर आहे.

4/5

सौम्या सेठनेही (Saumya Seth) लग्न केले आणि त्यानंतर स्वतःला अभिनयाच्या जगापासून दूर केले. ती शेवटचा चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेत दिसली होती. 

5/5

'ये है मोहब्बतें' या मालिकेत मिहिका वर्माने ( Mihika Verma) दिव्यांकाच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पण नंतर मिहिकाने एनआरआयशी लग्न केल्यानंतर अभिनय सोडला आणि अमेरिकेत स्थायिक झाली.