कोहलीला Paternity Leave;'या' खेळाडूंना नव्हती मिळाली ही संधी

| Nov 19, 2020, 13:48 PM IST
1/5

रणजी संघात जेव्हा विराट कोहली खेळत होता

रणजी संघात जेव्हा विराट कोहली खेळत होता

१४ वर्षांपूर्वी २००६ मध्ये विराट कोहली दिल्लीत रणजी संघात खेळत होता. तेव्हा त्याचा खेळाप्रतीचा भाव दिला. ९ डिसेंबर २००६ मध्ये रणजी टीमचा मुकाबला कर्नाटक टीमशी होती. त्या दिवशी विराटने ४० धावा केल्या. त्याच दिवशी विराट कोहलीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच निधन झालं. तेव्हा विराट कोहली अवघ्या १८ वर्षांचा होता. तेव्हा त्यांच्या अंत्यविधी करून तो पुन्हा मैदानात सामना खेळायला आणि ९० धावा करून टीमला Follow On पासून वाचवलं.

2/5

गावस्करने खूप दिवसांनी पाहिलं बाळाला

गावस्करने खूप दिवसांनी पाहिलं बाळाला

१९७६ मध्ये सुनील गावस्कर न्यूझीलंडमध्ये सामना खेळत होते. त्याचवेळी मुलगा रोहन गावस्करचा जन्म झाल्याचं कळलं. गावस्कर यांना भारतात परतायचं होतं कारण भारतीय संघाला सीरीज वेस्ट इंडीजविरूद्ध खेळायचं होतं. पण BCCI ने गावस्करांना परवानगी नाकारली. गावस्करांनी तब्बल अडीच महिन्यांनी मुलाला पाहिलं.     

3/5

सचिन फक्त चार दिवसात परतला

सचिन फक्त चार दिवसात परतला

१९९९ चा इंग्लंडमध्ये झालेला क्रिकेट वर्ल्ड कप तुम्हाला माहित असेलच. या दरम्यान सचिन तेंडुलकरच्या वडिलांचे निधन झाले होते. भारत या वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना हरले होते. दुसरा सामना झिम्बाब्वेसोबत होती तेव्हा सचिनला आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली. सचिन यावेळी भारतात परतला आणि संघ सामना हरले. मात्र आपल्या संघाला संकटात न ठेवता सचिन अवघ्या ४ दिवसांत परतला होता. केन्याविरूद्ध खेळताना सचिनने १४० धावा करत शतक पूर्ण केलं. सचिनने यानंतर आकाशात बॅट दाखवत आपल्या वडिलांना श्रध्दांजली वाहिली.

4/5

बाकी सगळ्या गोष्टी वाट पाहू शकतात..... धोनी

बाकी सगळ्या गोष्टी वाट पाहू शकतात..... धोनी

२०१५ मध्ये भारताचा संघ वर्ल्ड कपच्या तयारीत होता. ऑस्ट्रेलियात Warm Up Match सुरू होती. तेव्हा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या घरी एका गोंडस परीने जन्म घेतला होता. खेळावर लक्ष राहावं म्हणून धोनीने यावेळी आपला मोबाईल लांब ठेवला होता. साक्षीने मुलीला जन्म दिल्याची माहिती टीम इंडियाला आणि धोनीला क्रिकेटर सुरेश रैनाने दिली. त्यावेळी पत्रकारांनी धोनीला विचारलं की, तुला यावेळी भारतात राहायचं नव्हता का? तेव्हा धोनी म्हणाला की, मी राष्ट्रसेवा करत आहे बाकी सर्व गोष्टी वाट पाहू शकतात. 

5/5

मुलीच्या जन्माच्या शुभेच्छा स्कोर बोर्डवर देण्यात आल्या

मुलीच्या जन्माच्या शुभेच्छा स्कोर बोर्डवर देण्यात आल्या

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर एलन बॉर्डवर १९८६ मध्ये सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये भारताविरूद्ध टेस्ट सामना खेळत होती. त्यांचा संघ सामन्याला ड्रॉ करण्यासाठी संघर्ष करत होता. याचवेळी त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. एलन बॉर्डरला यावेळी पत्नीसोबत राहायचं होतं पण त्यांना ते या सामन्यामुळे शक्य झालं नाही.  बाळ झाल्याची माहिती यावेळी एलन बॉर्डरला स्कोर बोर्डवर देण्यात आली.