Beer सोबत चकणा म्हणून चुकूनही करू नका 'या' गोष्टींचे सेवन; होऊ शकतात गंभीर आजार

Food Not eat With Beer : उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. आता प्रत्येक व्यक्ती थंड पेय पिण्यासाठी धावपळ करत असते. कोणी लिंबू पाणी, नारळ पाणी तर कोकम सरबत प्रत्येक व्यक्ती त्याला आवडेल ते थंड पेय पिताना दिसतात. अशात जे लोक मद्यपान करतात ते लोक उन्हाळ्यात बिअर पिण्यास सुरुवात करतात. पण बिअर असो किंवा कोणत्याही प्रकारचं मद्यपान ते आपल्या शरीरासाठी हानिकारकच असते. तर बिअरसोबत कोणत्या अशा पाच गोष्टी आहेत ज्या खायला नको. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

| May 13, 2023, 18:21 PM IST
1/7

आत्मा शांती झाल्याची संतुष्टता पण होऊ शकतात गंभीर आजार

Food Not eat With Beer

थंडगार बिअर नक्कीच तुम्हाला आवडेल... उन्हाळ्यात थंडी बिअर पिल्यानंतर तुम्हाला आत्मा तृप्त झाली असं वाटू शकतं. पण त्यानं तुमच्या आरोग्यावर किती वाईट होणार आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.   

2/7

होऊ शकतो वाईट परिणाम

Food Not eat With Beer

जर तुम्ही बिअरसोबत काही खास गोष्टींचे सेवन केले तर त्याचा त्वरित वाईट परिणाम तुम्हाला जाणवू शकतो. आज आपण अशाच गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यांचे सेवन बिअरसोबत करणे तुम्ही टाळायला हवं. 

3/7

टोमॅटो

Food Not eat With Beer

टोमॅटो हा आंबट असतो कारण त्यात टॅनिक अॅसिड खूप प्रमाणात असते. आंबट टोमॅटो जर तुम्ही बिअरसोबत खाल्ले तर पोट दुखू लागेल आणि उल्टी किंवा इतर काही समस्या होण्याची शक्यता असते. 

4/7

अमरफळ किंवा पर्सिमॉन फळ

Food Not eat With Beer

टोमॅटो प्रमाणे या फळात देखील टॅनिक अॅसिड असते. हे फळ जर तुम्ही बियरसोबत खाल्लं तर किडनी स्टोन होण्याची भीती असते. फक्त मद्यपान नाही तर याला कोणत्याही हाय प्रोटीन फूडसोबत खाल्यासही नुकसान होऊ शकते. 

5/7

बीन्स

Food Not eat With Beer

जर तुम्ही बीन्स किंवा डाळीत बनवलेले काही पदार्थ बिअरसोबत खाणार असाल तर त्याचा विचार सोडा. यात आयरनचे खूप जास्त प्रमाण असते आणि बिअरमध्ये टॅनिक असतं त्यामुळे बीन्स किंवा डाळीत असलेले मिनरल्स आपल्या शरीराला मिळत नाहीत.

6/7

गाजर

Food Not eat With Beer

अनेक लोकांना सवय असते की बिअर पिताना सॅलेड म्हणून ते गाजर खातात. तर तुम्ही देखील विचार करत असाल तर आजच टाळा. बिअर आणि गाजरचं कॉम्बिनेशन लिव्हरसाठी योग्य नाही. 

7/7

बेकन

Food Not eat With Beer

बेकन हा जेवणातला असा प्रकार आहे की त्यात नाइट्रोसामाइन सगळ्यात जास्त प्रमाणात असते. नाइट्रोसामाइनचं प्रमाण बिअरमध्ये देखील असते. त्यामुळे हे दोघांचे एकत्र सेवन करू नये. (All Photo Credit : pexels) (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)