पाकिटात चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी, एका क्षणात व्हाल कंगाल!

अनेकजण पाकिटात पैसे ठेवण्यासोबतच इतर काही गोष्टीही ठेवतात. यामुळे अनेकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. 

Mar 14, 2024, 23:12 PM IST

अनेकजण पाकिटात पैसे ठेवण्यासोबतच इतर काही गोष्टीही ठेवतात. यामुळे अनेकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. 

 

1/9

आर्थिक समस्यांचा सामना

Do not keep these things in wallet will face financial loss

सध्या पैशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकजण पैसे कमावण्यासाठी धडपड करत असतो. अनेकदा दिवसरात्र मेहनत करुनही पैसा टिकत नाही. यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.   

2/9

पाकिटात पैसे ठेवण्यासोबत चुकूनही ठेवू नका या गोष्टी

Do not keep these things in wallet will face financial loss

आपल्यापैकी अनेकजण हे पाकिटात पैसे ठेवण्यासोबतच इतर काही गोष्टीही ठेवतात. पण याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.

3/9

तुमचे आर्थिक नुकसान निश्चित

Do not keep these things in wallet will face financial loss

ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्ही काही गोष्टी पर्समध्ये नियमित ठेवत असाल तर तुमचे आर्थिक नुकसान निश्चित होऊ शकते. त्यासोबतच आरोग्यावरही याचे वाईट परिणाम होतात.  

4/9

जुने बिल

Do not keep these things in wallet will face financial loss

आपल्यातील अनेकांना कपडे, वस्तू यांसारख्या खरेदी केलेल्या गोष्टींची बिल पर्समध्ये ठेवण्याची सवय असते. पण ज्योतिष शास्त्रानुसार जुने बिल पर्समध्ये ठेवणे योग्य मानलं जात नाही. यामुळे नकारात्मकता वाढते. विशेष म्हणजे जुने बिल पर्समध्ये ठेवल्यामुळे तुमच्या अनावश्यक खर्चातही वाढ होते. यामुळे तुमचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होते.  

5/9

कर्जात होईल आणखी वाढ

Do not keep these things in wallet will face financial loss

जर तुम्ही एखाद्याच्या कर्जाची रक्कम परत करण्यासाठी जात असाल किंवा कोणाकडून कर्ज घेतलेली रक्कम घेऊन येत असाल तर ते पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका. यामुळे तुमच्या कर्जामध्ये अजून वाढ होते.

6/9

मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो ठेवणे टाळा

Do not keep these things in wallet will face financial loss

अनेकजण त्यांच्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो पर्समध्ये ठेवतात. पण असे अजिबात करु नये. यामुळे वास्तूदोष निर्माण होतो.  

7/9

देवी-देवतांचे फोटोही ठेवू नका

Do not keep these things in wallet will face financial loss

पाकिटात देवी-देवतांचे चित्र असलेला कोणताही कागद किंवा त्यासंबंधित वस्तू ठेवू नये.  

8/9

चावी ठेवणेही टाळा

Do not keep these things in wallet will face financial loss

पर्समध्ये चावी ठेवणेही टाळावे. त्यामुळे सतत पैशांची हानी होते.

9/9

फक्त पैसे ठेवा

Do not keep these things in wallet will face financial loss

पर्स किंवा पाकिट हे लक्ष्मी देवीचे स्थान मानले जाते. त्यामुळे त्यात फक्त पैसे ठेवावेत. त्यासोबतच एखादी चांदीची वस्तू ठेवू शकता. पण त्याशिवाय इतर कोणतीही गोष्टी त्यात ठेवू नये.