PHOTO: दुर्लक्ष नकोच; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

Heart Attack Symptoms on Face: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे दिसून येतात. फक्त तुम्ही ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखली पाहिजे यावर दुर्लक्ष करू केल्याने त्रास जास्त होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या नसांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे छातीत वेदना सुरू होतात.  

Aug 05, 2024, 14:39 PM IST
1/7

 आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढला आहे. अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये खूप वाढ झाली आहे. केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागत आहे. जेव्हा हृदयातील रक्त कमी होते किंवा ब्लॉक होते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर अनेक प्रकारचे सिग्नल देऊ लागतात. 

2/7

पण अनेकदा लोकांना ही चिन्हे समजण्यास उशीर लागतो. ही चिन्हे वेळीच ओळखली तर हृदयविकाराचा धोका टळू शकतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यात अडचण येवढच मर्यादित नाही. कधीकधी हृदयविकाराची काही लक्षणे चेहऱ्यावरही दिसू शकतात.

3/7

चेहऱ्यावर सूज येणे

कोणत्याही कारणाशिवाय चेहऱ्यावर सूज आल्यास ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. हृदयामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, ते शरीरात योग्यरित्या रक्त प्रवाहित करण्यास सक्षम नाही. यामुळे शरीरात द्रव पदार्थ साचू लागतो, त्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते. 

4/7

डोळ्याभोवती कोलेस्ट्रॉल जमा होणे

डोळ्यांखाली आणि पापण्यांभोवती कोलेस्टेरॉल जमा होणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे कारण असू शकते. त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूला हलक्या पिवळ्या रंगाचे पदार्थ जमा होऊ लागतात. वैद्यकीय भाषेत याला Xanthelasma म्हणतात. हे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त प्रवाह रोखू शकते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

5/7

चेहऱ्याच्या डाव्या बाजूला वेदना

चेहऱ्याच्या डाव्या बाजूला वेदना किंवा सुन्नपणा जाणवणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते . जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला खूप दिवसांपासून वेदना आणि सुन्नपणा जाणवत असेल तर चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

6/7

चेहरा निळा किंवा फिकट होणे

चेहऱ्याचा रंग अचानक निळा किंवा फिकट होणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. खरं तर, जेव्हा हृदय योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीराच्या काही भागांमध्ये पुरेसे ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नाही. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. 

7/7

इअरलोब क्रीज

इअरलोब क्रीज हे कोरोनरी आर्टरी डिजीज संबंधित एक लक्षण आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दर्शविणाऱ्या लोकांमध्ये इअरलोब क्रीज सामान्य आहेत. हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण नाही.