Salary Calculator: पगार मिळताच तात्काळ करा ही कामं, अन्यथा पैसे खर्च झालेच समजा

Salary Account: सध्या महागाई इतकी वाढली आहे की लोकांचा खर्च भागत नाही. महिना संपायच्या आत पगारही संपतो. अशा परिस्थितीत लोकांनी पगार मिळताच काही बाबी करणं गरजेचं आहे. अन्यथा महिना अखेर काही शिल्लक उरणार नाही

Dec 04, 2022, 16:13 PM IST
1/5

Salary

Monthly Salary: सध्या व्यावसायिकांपेक्षा नोकरदार वर्ग सर्वाधिक आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना महिना संपल्यानंतर पगार दिला जातो. पण महिनाभर पगाराची वाट पाहून खर्चही भागत नाही. अशा परिस्थितीत पगार मिळताच लोकांनी काही पावले उचलली पाहिजेत, अन्यथा सर्व पैसे संपू शकतात.

2/5

Salary

पगारातील पैशांची बचत करणं ही एक कला आहे. पण पगार मिळताच लोक पैसे खर्च करतात. दुसरीकडे गुंतवणुकीकडे कानाडोळा करतात. अशा स्थिती असेल वेळीच सावध राहणं गरजेचं आहे. 

3/5

Salary

चुकीच्या धारणेनुसार लोकं पगार झाल्या झाल्या आपला खर्च भागवतात आणि मग महिन्याच्या शेवटी पगारातून जे पैसे वाचतील त्यातून गुंतवणूक करतात. पण यामुळे बचत किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक होऊ शकत नाही.

4/5

Salary

पगार येताच, लोकांनी प्रथम बचत आणि गुंतवणुकीला दिलं पाहीजे. बचतीची रक्कम बाजूला काढून खर्च भागवण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. जर तुम्ही असे केले नाही तर संपूर्ण पगार संपू शकतो आणि नंतर बचत किंवा गुंतवणूक करता येणार नाही.

5/5

Salary

पगार येताच बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याने अनावश्यक खर्चालाही आळा बसेल. संपूर्ण महिन्यात कोणते खर्च प्राधान्याने राहतील आणि कोणते खर्च केले नाहीत तरी चालतील, यावर लक्ष राहील. अशा परिस्थितीत पगार येताच तात्काळ बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे.