Dream Science: अशी स्वप्न देतात भविष्याबाबत शुभ संकेत, नेमका अर्थ काय? जाणून घ्या

Dream Meaning: प्रत्येक मानवाला स्वप्न ही पडतात स्वप्नात दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही रहस्य दडलेले असते. काही वाईट तर काही चांगली स्वप्ने असतात. काही स्वप्ने आठवतात तर काही विसरून जातो. स्वप्नात काही गोष्टी पाहणे खूप शुभ मानले जाते.  

Nov 13, 2022, 20:32 PM IST
1/5

Dream Prediction

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्याला स्वप्नात काही  प्राणी दिसले तर शुभ मानलं जातं. त्या स्वप्नांचा अर्थ भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. अशी स्वप्न पडणाऱ्या व्यक्तींना भाग्यवान मानले जातं.

2/5

Dream Prediction

पांढरा सिंह प्रगतीचे प्रतीक आहे. स्वप्नात पांढरा सिंह दिसला तर समजून घ्या की करिअरमध्ये खूप प्रगती होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते.

3/5

Dream Prediction

स्वप्नात पांढरा हत्ती बघणं देखील खूप शुभ मानले जाते. पांढरा हत्ती देवराज इंद्राचे वाहन आहे असे मानले जाते. अशा स्थितीत जर स्वप्नात पांढरा हत्ती दिसला तर माणसाच्या आयुष्यात मोठे बदल होतात. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

4/5

Dream Prediction

स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप पाहिल्यास खूप आनंददायी परिणाम मिळतात. जर एखाद्याला स्वप्नात पांढरा साप दिसला तर समजा त्याचे नशीब रातोरात बदलणार आहे. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने अशा व्यक्तींना प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळते.

5/5

Dream Prediction

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पांढरा मोर दिसला तर समजून घ्या की त्याला नशिबाची साथ मिळणार आहे. पांढरा मोर अत्यंत शुभ मानला जातो. या स्वप्नामुळे लोक जीवनात मोठे यश मिळवतात. त्यांना कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळू लागतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)