मायलेकरांचा मृत्यू... मद्यपींच्या स्कॉर्पिओने केला KWID चा चेंदामेंदा! अंगावर काटा आणणारे Photos

Drink And Drive Accident Killed Family: मरण पावलेल्यांमध्ये महिला, तिची दोन चिमुकली मुलं आणि या मुलांच्या आजीचा समावेश आहे. अपघातामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून ज्या मद्यपी तरुणांमुळे अपघात झाला त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. नक्की घडलं काय आणि अपघातानंतरची घटनास्थळावरील फोटो पाहूयात...

| Sep 14, 2024, 10:15 AM IST
1/9

sambhajinagaraccident

अपघाताच्या ठिकाणावरील धक्कादायक फोटो अंगावर काटा आणणारे असून नेमका घटनाक्रम काय आहे जाणून घ्या....

2/9

sambhajinagaraccident

छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या एका भीषण अपंघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.  

3/9

sambhajinagaraccident

दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.  

4/9

sambhajinagaraccident

छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरात असलेल्या टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे.   

5/9

sambhajinagaraccident

दारू पिऊन भरधाव वेगात स्कॉर्पिओ चालवणाऱ्या दोन तरुणांनी दुभाजक ओलांडून पलीकडे जाणाऱ्या क्विड कारला जोरदार धडक दिली. याच क्विड कारमधून अमरावती येथील अभियंते अजय देसरकर आपल्या कुटुंबासहीत पुण्याला जात होते त्यावेळेस हा अपघात घडला.   

6/9

sambhajinagaraccident

दुभाजक ओलांडून समोरुन आलेल्या स्कॉर्पिओने या क्विड कारला दिलेली धडक एवढी जोरदार होती की या छोट्या कारचा चेंदामेंदा झाला. अपघाताची दाहकता कारची अवस्था पाहूनच समजते.

7/9

sambhajinagaraccident

या कारच्या आजूबाजूला अपघातानंतरही काही तास बघ्यांची गर्दी हटत नव्हती. क्विडच्या तुलनेत स्कॉर्पिओला कमी नुकसान झालं असून गाडीची बांधणी दणकट असल्याने कारमधील तरुणांना केवळ दुखापत झाल्याचे समजते.

8/9

sambhajinagaraccident

मृणालिनी अजय बेसरकर (38), आशालता पोपळघोटे (65), दुर्गा सागर गिते (7) आणि सहा महिन्यांच्या बाळाचा मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातात 40 वर्षीय अजय अंबादास बेसरफर आणि 35 वर्षीय शुभांगीनी सागर गिले जखमी झाल्या आहेत.

9/9

sambhajinagaraccident

या प्रकरणामध्ये मद्यपान करुन कार चालवणाऱ्या स्कॉर्पिओमधील दोन्ही तरुणांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.