'मी कुराणऐवजी देशाकडून खेळण्याची संधी निवडेल कारण कुराणची प्रत...'; क्रिकेटरचं रोखठोक उत्तर

Cricketer Says I would Leave Behind the Quran: एका जाहीर कार्यक्रमामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला असता या क्रिकेटपटूने लगेच उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमका हा क्रिकेटपटू कोण आण त्याने असं का म्हटलं पाहूयात...

| Sep 14, 2024, 10:23 AM IST
1/14

 usmankhawaja

त्याने ही निवड का केली याबद्दलचा खुलासाही लगेच केला आहे. नक्की त्याने मुलाखतीमधील प्रश्नाला उत्तर देताना काय म्हटलंय जाणून घ्या....

2/14

 usmankhawaja

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज क्रिकेटपटू सध्या भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर चषकासाठी तयारी करत आहे.   

3/14

 usmankhawaja

ऑस्ट्रेलियन संघ नोव्हेंबर महिन्यामध्ये भारताविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धा खेळणार असून या संघात उस्मान ख्वाजाच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. 

4/14

 usmankhawaja

37 वर्षीय उस्मान ख्वाजा बॉर्डर-गावसकर स्पर्धेच्या मागील पर्वामध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन ठरलेला. त्याने 7 डावांमध्ये 333 धावा केलेल्या. भारताविरुद्धच्या 9 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 544 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 180 इतकी आहे.  

5/14

 usmankhawaja

मात्र सध्या ख्वाजा मैदानावरील कामगिरीसाठी नाही तर मैदानाबाहेरील विषयावर नोंदवलेल्या प्रतिक्रियेसाठी चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या कार्यक्रमात ख्वाजाने केलेल्या एका विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.   

6/14

 usmankhawaja

एका मुलाखतीमध्ये ख्वाजाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुराणची प्रत किंवा ऑस्ट्रेलियन संघाची टोपी यापैकी काय निवडशील असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला ख्वाजाने दिलेल्या उत्तराची सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा आहे.   

7/14

 usmankhawaja

पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे जन्मलेल्या उस्मान ख्वाजाचं कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालं त्यावेळेस तो अवघ्या चार वर्षांचा होता.   

8/14

 usmankhawaja

ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळणारा ख्वाजा हा पाहिला पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू ठरला. त्याने 2010-11 साली अॅशेज सिरीजमधून कसोटीत पदार्पण केलं. आजच्या घडीला तो ऑस्ट्रेलियन संघाचा अविभाज्य भाग आहे.

9/14

 usmankhawaja

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या कार्यक्रमामध्ये उस्मान ख्वाजाला तुला एकच गोष्ट ठेवण्याची संधी दिली तर तू कुराण स्वत:कडे ठेवशील की ऑस्ट्रेलियन संघाची टोपी? असं विचारलं गेलं. 

10/14

 usmankhawaja

ऑस्ट्रेलियाला अनेकदा सामने जिंकवून देणाऱ्या या खेळाडूने आपण कुराण आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या टोपीपैकी नक्कीच ऑस्ट्रेलियन संघाची टोपी निवडू असं म्हटलं आहे. आपल्या या निवडीचं समर्थन करताना त्याने कुरणची प्रत ही जगात कुठेही सहजपणे उपलब्ध होऊ शकते, असं म्हटलं आहे.

11/14

 usmankhawaja

त्यावर ख्वाजाने, "खरं तर उत्तर फार फारं सोपं आहे. मी कुराण मागे ठेवेन आणि ऑस्ट्रेलियन संघाची टोपी घेईन. कुराण हे कुठेही सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. मी त्याऐवजी टोपी निवडेल नक्कीच," असं उत्तर दिलं.  

12/14

 usmankhawaja

अॅशेजच्या 2021-22 च्या पर्वामध्ये दमदार पुनरागमन करणाऱ्या ख्वाजाने या मालिकेमध्ये दोन दमदार शतकं झळकावली होती. 2023 मध्ये तो कसोटीत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने या वर्षभरात 13 सामन्यांमध्ये 52.60 च्या सरासरीने 1210 धावा केल्या होत्या.

13/14

 usmankhawaja

सध्या उस्मान ख्वाजा पत्नी आणि दोन मुलींसहीत ऑस्ट्रेलियामध्येच राहत असून तेथील नागरिकत्वही त्याने घेतलं आहे. सध्या त्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही.  

14/14

 usmankhawaja

उस्मान ख्वाजाची पत्नीही इस्लाम धर्माचं पालन करते. तो अनेकदा पत्नी आणि मुली प्रार्थना करत असल्याचे व्हिडीओ पोस्ट करताना इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतं.