त्यावेळी शाहरुखमुळे अमिताभ स्वत:ला समजायचे 'दुय्यम दर्जाचा नागरिक'; 'बिग बीं'च्या मित्राकडूनच खुलासा

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen: अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या कलाकारांपैकी आहेत. मात्र एकेकाळी शाहरुख खानमुळे अमिताभ हे स्वत:ला 'दुय्यम नागरिक' समजत होते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. यासंदर्भातील मोठा खुलासा अमिताभ यांच्या निकटवर्तीयानेच केला होता. जाणून घेऊयात नक्की काय घडलं होतं.

| Aug 14, 2023, 16:14 PM IST
1/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे दोघेही एकमेकांचा फार सन्मान करतात. बच्चन आणि खान कुटुंबाचे घरोब्याचे संबंध आहेत. दोघांमधील मैत्री जगजाहीर आहे. या जोडीने सर्वात आधी 2000 साली मोठ्या पडद्यावर 'मोहब्बते'च्या माध्यमातून स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

2/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

'मोहब्बते' चित्रपटाचं दिग्दर्शन यश चोप्रा यांचे पुत्र आदित्य चोप्राने केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सगळीकडे शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांचीच चर्चा होती. मात्र अमिताभ यांच्या एका मित्राने अमिताभ-यश चोप्रा आणि शाहरुख खानसंदर्भात एक मोठा खुलासा केला होता. या खुलाश्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झालेला.

3/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

2000 साली प्रदर्शित झालेला 'मोहब्बते' बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. या चित्रपटाचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. या चित्रपटातून पहिल्यांदाच शाहरुख आणि आमिताभ हे दोन्ही मोठे कलाकार एकत्र आले होते. अमिताभ यांनी चित्रपटामध्ये नारायण शंकर नावाची भूमिका साकारली होती. तर शाहरुखने राज आर्यन मल्होत्राची भूमिका साकारली होती. 

4/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

मात्र अमिताभ यांनी साकारलेल्या नारायण शंकर या भूमिकेसंदर्भात त्यांच्या एका जवळच्या मित्राने खुलासा केला होता. 'मोहब्बते' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अमिताभ स्वत:ला 'दुय्यम दर्जाच्या नागरिका'सारखं समजत होते. यामागील घटनाक्रम फारच धक्कादायक असल्याचं या मित्राने सांगितलं होतं.

5/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

'मोहब्बते' आणि अमिताभ यांच्याशी संबंधित खुलासा त्यांचे मित्र अमर सिंह यांनी केला होता. त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'मोहब्बते'च्या शुटींगदरम्यान आपण बराच वेळ अमिताभ यांच्याबरोबर होतो असं सांगितलं. चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल अमिताभ आपल्याला सांगायचे असा दावाही अमर सिंह यांनी केला. 

6/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

"मला आठवतंय की 'मोहब्बते'च्या शुटींगनंतर ते (अमिताभ बच्चन) भेटायला यायचे तेव्हा फार दुखी असायचे. त्यांना वाटायचं की चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खानला जास्त महत्त्व दिलं जात आहे," असं अमर सिंह म्हणाले होते.

7/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

अमर सिंह यांनी केलेल्या दाव्यामध्ये अमिताभ यांनी त्यांना यश चोप्रांबरोबर 'दीवार' आणि 'कभी-कभी'सारख्या चित्रपटांमध्ये काम केल्याचं सांगितलं. " 'मोहब्बते'च्या सेटवर मला दुय्यम दर्जाच्या नागरिकासारखं वाटायचं," असं अमिताभ म्हणाल्याची आठवण अमर सिंह यांनी सांगितली.

8/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अमिताभ हे निर्माते यश चोप्रांवर नाराज झाले होते. यश चोप्रा आपल्यापेक्षा शाहरुखला अधिक महत्त्व देत होते असं अमिताभ यांना वाटत होते. अमर सिंह आणि अमिताभ यांच्यातील नातं बिघडल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला होता.

9/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

एकेकाळी अमिताभ आणि अमर सिंह यांचे फार घरोब्याचे संबंध होते. मात्र काही खासगी कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर हे दोघे कधीच सार्वजनिक जीवनामध्ये एकत्र दिसले नाहीत.

10/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर अमिताभ यांनी कधीच अमर सिंह यांच्याबद्दल काही भाष्य केलं नाही. मात्र अमर सिंह अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर बच्चन कुटुंबावर टीका करायचे. अमिताभ यांच्या चित्रपटांपासून खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींबद्दल अमर सिंह बोलायचे.

11/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

अमर सिंह यांनी 'मोहब्बते'संदर्भात केलेलं विधान फारच स्फोटक ठरलं. कारण हा चित्रपट अमिताभ यांनी स्वत:च या भूमिकासाठी स्वत:ची शिफारस करुन मिळाला होता. अमिताभ यांनी स्वत: यश चोप्रांकडे या चित्रपटामध्ये काम देण्यासाठी विचारणा केली होती.

12/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

अमिताभ यांनी स्वत: चित्रपट मागून घेतला असल्यानेच अमर सिंह यांच्या विधानांवर लोकांना विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. मात्र हे ही खरं आहे की चित्रपटामुळे अमिताभ यांच्या करिअरला मोठा हातभार लागला होता. 

13/13

Shah Rukh Khan Amitabh Bachchan 2nd Class Citizen

'मोहब्बते'च्या कालावधीमध्येच अमिताभ यांची निर्मिती कंपनी एबीसीएल बुडाली होती. त्यामुळे अमिताभ यांची प्रतिमा खराब झाली होती. आर्थिक संकटाचाही अमिताभ यांना सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांना 'मोहब्बते' चित्रपट मिळाला होता आणि याचा त्यांना फार फायदा झाला.